Ujjwal Nikam : मुंबई बॉम्बस्फोटातील 12 आरोपींची निर्दोष मुक्तता; उज्वल निकमांनी चिंता व्यक्त करत सांगितला पुढचा मार्ग, ‘चूक कोणाची, ही गंभीर बाब’

Mumbai Local Trai Bomb Blast 2006 : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये 2006 मध्ये हा भीषण दहशतवादी हल्ला होता. मुंबईत 1993 मधील बॉम्बस्फोटात ज्या प्रमाणे आरडीएक्स होते, त्याच पद्धतीने 2006 च्या स्फोटातही आरडीएक्स वापरले गेले होते.
Ujjwal Nikam
Ujjwal NikamSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 21 July : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील 12 आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तब्बल 19 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली आहे. खंडपीठाच्या निर्णयानंतर मग हे साखळी बॉम्बस्फोट कोणी केले, असा सवाल उपस्थित होत आहे. यावर विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांनी ‘ज्या पुरावांच्या आधारावर मुंबई सत्र न्यायालय शिक्षा थोठवतो, तेच पुरावे उच्च न्यायालयात टिकतं नसतील तर चूक कोणाची? सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता होणे ही गंभीर बाब आहे आणि मला खात्री आहे की, सरकार सर्वोच न्यायालयात याविरोधात अपील दाखल करेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

उज्वल निकम (Ujjwal Nikam) म्हणाले, मुंबई सत्र न्यायालयाने ज्या पुरावांच्या आधारावर बारा आरोपींना शिक्षा ठोठावली आहे, तेच पुरावे उच्च न्यायालयात टिकतं नसतील तर चूक कोणाची? कायद्याचे विश्लेषण करताना चूक झाली की यंत्रणने चुकीचे पुरावे गोळा केले, याचे पोस्टमार्टम यथावकाश होईल. पण, आरोपींची मुक्तता होणे गंभीर आहे, मला खात्री आहे की, याविरोधात सरकार सर्वोच न्यायालयात अपील दाखल करेल.

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये 2006 मध्ये हा भीषण दहशतवादी हल्ला होता. मुंबईत 1993 मधील बॉम्बस्फोटात (Bomb Blast) ज्या प्रमाणे आरडीएक्स होते, त्याच पद्धतीने 2006 च्या स्फोटातही आरडीएक्स वापरले गेले होते. सकृतदर्शनी असं दिसतं की, मुंबई सत्र न्यायालयात आरोपीने जे कबुलीजबाब दिले आहेत, त्या आधारावर त्यांना शिक्षा ठोठावली आहे.

अर्थात, हे जबाब पोटा कायद्याखाली नोंदवण्यात आले आहेत, तसेच इतर जे पुरावे आहेत, ते मुंबई उच्च न्यायालयाने अस्वीकार्य मानलेलं आहेत. या पुरावाव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असंही निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे, असेही निकम यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण अभ्यास करून या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात ‘स्टे’ मागितला पाहिजे. बॉम्बस्फ़ोटत अनेक निरपारध लोकं मारली गेली आहेत, त्यामुळे आरोपींची अशा पद्धतीने मुक्तता होणे, खटल्यातील पुराव्यावर न्यायालयाने विश्वास न ठेवणे हे अतिशय गंभीर आहे.

Ujjwal Nikam
Ajit Pawar : 'छावा'च्या प्रदेशाध्याला मारहाणीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, सूरज चव्हाणचे नावही घेतले नाही!

सरकारने देखील या निर्णयाचे अवलोकन केलं पाहिजे आणि सर्वोच्च न्यायलयात दाद मागितली पाहिजे. ज्या पुरावांच्या आधारावर मुंबई सत्र न्यायालय शिक्षा ठोठावते, तेच पुरावे उच्च न्यायालयात टिकतं नसतील तर चूक कोणाची? असा सवालही उज्वल निकम यांनी केला.

ते म्हणाले, कायद्याचे विश्लेषण करताना चूक झाली की यंत्रणेने चुकीचे पुरावे गोळा केले, याचे पोस्टमार्टम यथावकाश होईल. बॉम्बस्फोटातील आरोपींची मुक्तता होणे गंभीर आहे, मला खात्री आहे सरकार सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करेल.

Ujjwal Nikam
Eknath Khadse on Honey Trap : महाजनांशी संबंध आले अन् गरीब लोढा कोट्याधीश् झाला, एकनाथ खडसेंचे गंभीर आरोप

बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू, तर 800 हून अधिक जखमी झाले होते

मुंबईत 2006 मध्ये लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला होता, तर 800 हून अधिकजण जखमी झाले होते. विशेष न्यायालयाने 2015 मध्ये यातील 12 आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी, तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरीत 11 जणांनी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com