Phaltan News : नीरा-देवघरसाठी लवकरच निधी मिळणार : खासदार निंबाळकर

Ranjitsinh Naik Nimbalkar दिल्ली येथे बुधवार (ता. ५) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कुशवेंद्र ओहरा यांची भेट घेवून चर्चा केली. त्यावेळी ओहरा यांनी निधीबाबत अश्वस्त केले.
Ranjitsinh Nimbalkar, Kushvendra Ohara
Ranjitsinh Nimbalkar, Kushvendra Oharasarkarnama

-किरण बोळे

Phaltan News : नीरा-देवघर धरण प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र शासन Central Government लवकरच निधी उपलब्ध करुन देईल, आश्वासन सेंट्रल वॉटर कमिटीचे अध्यक्ष कुशवेंद्र ओहरा यांनी दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान दिले. यावेळी महाराष्ट्रातील ५५ तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी केंद्र शासनाने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी यावेळी खासदार निंबाळकर यांनी केली.

दिल्ली येथे बुधवार (ता. ५) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कुशवेंद्र ओहरा यांची भेट घेवून चर्चा केली. त्यावेळी ओहरा यांनी निधीबाबत अश्वस्त केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील पंचावन्न दुष्काळी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्णतः मार्गी लागण्यासाठी या प्रकल्पांच्या कामांसाठी व नदी जोड प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद व्हावी.

तसेच येथील दुष्काळ कायम स्वरूपी संपण्यासाठी केंद्र शासनाने प्रस्ताव तयार करावा आशी मागणी खासदार निंबाळकर यांनी ओहरा यांचेकडे केली. त्याचबरोबर ज्या राज्यामध्ये जलसंपदाचे काम उत्तमरित्या सुरु आहे, त्या राज्यात अभ्यास दौरा करुन जलसंपदा सदस्य व अधिकारी यांना बरोबर घेऊन अभ्यासपूर्ण अहवाल तयार करावा.

Ranjitsinh Nimbalkar, Kushvendra Ohara
Phaltan : बुलेट ट्रेन माढा लोकसभा मतदारसंघातून जाणार; मोदींकडून हिरवा कंदील...

पावसाळ्यात कृष्णा नदीतून वाहुन जाणारे अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळी भागास कसा करता येईल हेही खासदार निंबाळकर यांनी निदर्शनास आणुन दिले. कोल्हापूर ,सांगली, सातारा, सोलापूर व मराठवाड्यातील काही दुष्काळी तालुके या भागामध्ये पाणी कशा पद्धतीने नेता येईल. यासाठी केंद्र शासनाने समिती गठीत करावी, अशी मागणी करुन नीरा-देवघर प्रकल्पातील कामाच्या निधीबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल कुशवेंद्र ओहरा यांना खासदार निंबाळकर यांनी धन्यवाद दिले.

Ranjitsinh Nimbalkar, Kushvendra Ohara
Phaltan News: निरा देवघरचे पाणी व्हाया धोम बलकवडी येणार; रणजितसिंह निंबाळकरांचा करिष्मा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com