Solapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापुरात असंघटीत कामगारांना घरांचे वाटप होणार आहे. सुमारे १५ हजार घरे बांधून तयार झाली आहेत, त्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यातील पाच महिला कामगारांना मोदी यांच्या हस्ते घरांच्या चाव्या देण्यात येणार आहेत. (Prime Minister Narendra Modi will give house keys to five workers)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या संकल्पनेतून कुंभारी येथील रे नगर येथे असंघटीत कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात तब्बल १५ हजार घरे बांधून पूर्ण झाली आहेत. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्यासाठी आज मोदी सोलापुरात येत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात घरांच्या चाव्या देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सुनीता मूदयप्पा जगले, लता विजय दासरी, रिझवाना लालमोहम्मद मकानदार, बाळूबाई सुनील वाघमोडे आणि लता मनोहर आडम या पाच महिला कामगारांचा समावेश आहे. या पाच कामगारांना पंतप्रधानांच्या हस्ते घराच्या चाव्या देण्यात येणार आहेत.
मोदी यांच्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापुरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे विशेष हेलिकॉप्टरने थेट कार्यक्रमस्थळी म्हणजेच कुंभारीच्या रे नगर येथे दाखल झाले आहेत. उपमुख्यमंती देवेंद्र फडणवीस हे सातारा येथील विश्रामगृहातून रे नगरकडे रवाना झाले आहेत. तेही थोड्याच वेळात कार्यक्रमस्थळी दाखल होतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.