

Solapur, 20 August : आदित्य ठाकरे यांनी काय बोलावं, हा त्यांचा विषय आहे. पण त्यांच्या वक्तव्याकडे अधिकचं लक्ष द्यावं, असं मला वाटत नाही. कारण ते कधी गांभीर्यानं बोलत नाहीत आणि त्यांना गांभीर्य कशात असते, तेही समजत नाही, असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना लगावला.
भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक आज सोलापुरात झाली. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री गोरे यांना ‘मुख्यमंत्री कोट्यातून तीन आमदारांना फ्लॅट देण्यात आले,’ या आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.
विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये पॉकेटमनी देण्याबाबतचा कोणताही विषय अद्याप झालेला नाही. तरीही आदित्य ठाकरे यांना भविष्याची चिंता का पडते. त्यांनी आता आपल्या भविष्याची चिंता करण्याची आवश्यकता आहे, असा टोलाही गोरे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या मागणीबाबत गोरे म्हणाले, काय मागणी करावी, हा त्यांचा प्रश्न आहे. सरकार शिक्षणाबाबत सकारात्मक आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून शाळेची व्यवस्था बघितले जाते. शिक्षण खात्याच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था बघितली जाते. त्यामुळे कोण कोणाच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करायचा प्रश्न येत नाही.
भाजपची पश्चिम महाराष्ट्र संघटनात्मक बैठक झाली. या बैठकीत SIR कार्यक्रमाबाबत आमचे सर्व लोकप्रतिनिधींसोबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोबत बैठक झाली. लोकप्रतिनिधीनीं आपल्या मतदार संघात SIR चे काम विस्तारित प्रमाणात करावे, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.