Aditya thackeray: मोर्चाआधीच आदित्य ठाकरेंनी वात पेटवली; हिंदी भाषेचा जीआर नेमका कुणाचा?

Hindi language GR controversy News : येत्या एक दोन दिवसात अकरावी प्रवेशाची यादी लागली नाही तर या प्रश्नासाठी युवा सेना रस्त्यावर उतरणार आहे. लवकरच या प्रश्नी आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी मंत्री व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अकरावी प्रवेशासाठी ताटकळणाऱ्या राज्यातील 25 लाख विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असली तरी यादी अद्याप लागली नाही. त्यामुळे येत्या एक दोन दिवसात अकरावी प्रवेशाची यादी लागली नाही तर या प्रश्नासाठी युवा सेना रस्त्यावर उतरणार आहे. लवकरच या प्रश्नी आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी मंत्री व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला. तर दुसरीकडे हिंदीसक्तीवरून भाजपमध्ये अंतर्गत वाद असल्याची टीका त्यांनी करीत हिंदी भाषेचा जीआर नेमका कुणाचा? आहे असा सवाल करीत मोर्चाआधीच आदित्य ठाकरेंनी महायुतीत वात पेटवली आहे.

अकरावी प्रवेशाची यादी लागत नसल्याने 25 लाख विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, दहावीच्या परीक्षेचा निकाल 13 मे रोजी लागला आहे. निकाल लागून दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. त्यानंतरही अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र प्रवेश यादी लागली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असल्याची टीका आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी केली.

Aditya Thackeray
Shivsena UBT Politics: जळगावला संतप्त शिवसेना ठाकरे पक्षाची निदर्शने, बबनराव लोणीकर यांचा पुतळा जाळला!

हिंदीसक्तीवरून भाजपमध्ये अंतर्गत वाद

राज्यातील शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत पहिलीपासून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असा निर्धार मनसे, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने केला असल्याचा आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट करीत हिंदीसक्तीवरून भाजपमध्ये अंतर्गत वाद असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यासोबतच हिंदी भाषेचा जीआर नेमका कुणाचा? आहे हे आधी महायुती सरकारने पाहिले पाहिजे, अशी टीका करीत मोर्चाआधीच आदित्य ठाकरेंनी महायुतीत वात पेटवली आहे.

Aditya Thackeray
Raj-uddhav thackeray unity : ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणुकीत कोणाची होणार अडचण; 'हे' समीकरण ठरणार वरचढ!

दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तिसऱ्या भाषेबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पण त्यांनी अकरावी प्रवेशामधील गोंधळाबाबत एक शब्दही काढला नाही. तसेच याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी पडताळणी सुरू आहे, एवढेच उत्तर दिले.

Aditya Thackeray
Raj-uddhav thackeray unity : ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणुकीत कोणाची होणार अडचण; 'हे' समीकरण ठरणार वरचढ!

अकरावी प्रवेशासाठी ताटकळणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मात्र त्यांच्या भवितव्याबद्दल कोणत्याही अधिकृत माध्यमातून माहिती मिळत नसल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण आणि अकरावी प्रवेशोत्सुक अशा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.

Aditya Thackeray
Ajit Pawar Vs Eknath Shinde : अजित पवार-एकनाथ शिंदेंचे नेते भिडले, बैठकीत मोठा वाद

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com