Karmala Nagarpalika : जयवंतराव जगतापांच्या 30 वर्षांच्या गडाला सुरुंग लावण्याची विरोधकांची खेळी; भाजपच्या झेंड्याखाली एकत्र येणार

Jaywantrao Jagtap Vs All Party News : करमाळा नगरपरिषदेवर 30 वर्षे सत्ता असलेला जयवंतराव जगताप गट आता शिवसेना चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली विरोधक जगतापांविरोधात एकत्र आले आहेत.
Karmala Nagarpalika Election
Karmala Nagarpalika ElectionSarkarnama
Published on
Updated on
  1. करमाळा निवडणुकीत चुरस वाढली:
    करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप गट धनुष्यबाणावर लढणार, तर भाजप व विरोधक एकत्र येऊन जगतापविरोधी आघाडी तयार करत आहेत.

  2. नंदादेवी जगताप उमेदवारी निश्चित:
    जगताप गटाकडून जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदादेवी जगताप नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरतील, अशी शक्यता जवळपास निश्चित आहे.

  3. विरोधकांची एकजूट:
    भाजप, संजयमामा शिंदे गट, बागल गट आणि सावंत गट एकत्र येऊन जगतापांची ३० वर्षांची सत्ता उलथवण्याच्या तयारीत आहेत.

Karmala, 10 November : करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चोबांधणी केली आहे. शिवसेनेत नुकतेच दाखल झालेला माजी आमदार जयवंतराव जगताप गट धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदादेवी जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. जगताप गटाची 1995 पासून तब्बल ३० वर्षे नगरपरिषदेवर सत्ता आहे, त्यामुळे सत्ता कायम राखण्यासाठी जगतापांनी कंबर कसली असून जगतापांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपच्या झेंड्याखाली सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले आहेत.

करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सध्या सर्वपक्षीयांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून सर्व पर्यायाची चाचपणी केली जात आहे. सत्ताधारी जयवंतराव जगताप (Jayawantrao Jagtap) यांच्या पत्नी नंदादेवी जगताप यांची उमेदवारी निश्चित आहे. दुसऱ्या बाजूला सर्व जगताप विरोधक एकत्र येत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे.

भाजपकडून सुनीता देवी आणि विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या पत्नी तथा दिग्विजय आणि रश्मी बागल (Rashmi Bagal) यांच्या मावशी जयश्री विलासराव घुमरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे गट, बागल गट, भाजप हे सर्व एकत्र येऊन जगताप यांच्या विरोधात आवाहन उभे करत आहेत. जगताप यांची अनेक वर्षांची सत्ता रोखण्यासाठी विरोधकांनी अंतर्गत मतभेद विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

रश्मी बागल यांच्या कार्यालयात रविवारी (ता ०9 नोव्हेंबर) भाजप इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. या मुलाखतींसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल, भाजपचे प्रा. रामदास झोळ, कन्हैयालाल देवी उपस्थित होते. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांची बैठक ठेवण्यात आली होती, ही बैठक रविवारऐवजी सोमवारी होत आहे.

Karmala Nagarpalika Election
Rohit Pawar Vs Jaykumar Gore : जयकुमार गोरेजी आपण आधीच उघडे पडलात....आहे का हिंमत? : रोहित पवारांचा पलटवार

सावंत गटाकडून नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी मोहिनी सावंत यादेखील नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल करणारा असून सावंत यांनी नगराध्यक्ष पदासह सर्व जागांवर जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.

आमदार नारायण पाटील यांच्याकडून करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकदाही उमेदवार उभे करण्यात आलेले नाहीत. मात्र, थेट आमदार नारायण पाटील यांना मानणारा मतदारवर्ग करमाळा शहरात आहे. आमदार पाटील यांना विधानसभा निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप आणि सावंत या दोन्ही गटांनी पाठिंबा दिला आहे, त्यामुळे जगताप व सावंत यांनी एकत्रित निवडणूक लढवावी, यासाठी आमदार नारायण पाटील हे आग्रही आहेत.

Karmala Nagarpalika Election
MCA Election : शरद पवारांची फिल्डिंग पट्टशिष्यासाठी की ठाकरेंच्या शिलेदारासाठी?

सावंतांची चिरेबंदी सत्ता

दरम्यान, मागील पंचवार्षिकमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव वैभवराजे जगताप हे नगराध्यक्ष होते. तसेच, जयवंतराव जगताप हे दोन वेळा आमदार होते. विधानसभेच्या 1990 आणि 2004 या दोन्ही निवडणुकीत ते करमाळ्यातून निवडून आले होते. 1990 मध्ये अपक्ष, तर 2004 मध्ये शिवसेनेकडून ते आमदार झाले. सध्या ते करमाळा बाजार समितीचे सभापती असून अनेक वर्षांपासून जिल्हा बॅंकेचे संचालक आहेत.

Q1: करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रमुख स्पर्धक कोण आहेत?
A1: जयवंतराव जगताप गट आणि भाजप-समर्थित विरोधक यांच्यात मुख्य सामना होणार आहे.

Q2: नगराध्यक्षपदासाठी जगताप गटाची उमेदवार कोण?
A2: नंदादेवी जयवंतराव जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.

Q3: विरोधकांकडून कोणती नावे चर्चेत आहेत?
A3: जयश्री घुमरे आणि मोहिनी सावंत या संभाव्य उमेदवार आहेत.

Q4: या निवडणुकीत भाजपची भूमिका काय आहे?
A4: भाजपने जगतापांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकत्र करून संयुक्त उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com