Prithviraj Chavan : सरकारी पैशातून मोदींची जाहिरातबाजी; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'काँग्रेस तक्रार करणार...'

Criticism on Narendra Modi's advertisement : आतापर्यंत केंद्र सरकारने हे केलं, भाजपने हे केलं असे म्हणत होते. आता मोदींची गॅरंटी अशी जाहिरात सुरू आहे. मुळात ही व्यक्ती उमेदवार असून, त्याचा प्रचार तुम्ही सरकारी पैशाने करत आहात.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama

Satara News : सध्या भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच जाहिरातबाजी चालली आहे, पण केंद्र सरकारने हे केलं, भाजपने हे केलं असे म्हणत होते. आता मोदींची गॅरंटी अशी जाहिरात सुरू आहे. मुळात ही व्यक्ती उमेदवार असून, त्याचा प्रचार तुम्ही सरकारी पैशाने करत आहात. या विरोधात काँग्रेसच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविणार असल्याचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत सांगितले.

साताऱ्यातील काँग्रेस (Congress) भवनात आज इंडिया आघाडीतील 38 पक्ष व विविध संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, सध्या राज्यात सर्वकाही नरेंद्र मोदींच्या माध्यमातून चालले आहे, असे दाखवले जात आहे. पहिल्यांदा धमकी द्यायची त्यानंतर पक्षांतर करायला भाग पाडायचे, त्यानंतर तुरुंगात टाकायचे आणि चार्जशिट करायची नाही. कुठल्याही प्रकारे विरोधी पक्ष मोडून टाकायचा आणि वन पार्टी लोकशाही आणण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत.

Prithviraj Chavan
Lok Sabha Election2024 News: महायुतीतला गोंधळ आणखी वाढणार; माढा लोकसभेसाठी जानकर, आव्हाडांत खलबतं

सध्या माध्यमांवर एकच जाहिरात चालली आहे. भाजपनं हे केलं, ते केलं. नंतर केंद्र सरकारने केलं आता मोदींची गॅरंटी असे म्हणत आहेत. मुळात नरेंद्र मोदी हे लोकसभेचे उमेदवार असून, ती एक व्यक्ती आहे. त्याचा प्रचार सरकारी पैशाने करणे हे चुकीचे आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविणार आहोत. हा व्यक्ती स्तोम असून, फक्त मोदी मोदीच चालले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रशियात चीनमध्ये ज्यापद्धतीने घटना बदलली गेली. त्याच पद्धतीने आपलीही वाटचाल सुरू आहे. यापासून लोकांना सावध करून समविचारींना एकत्र घेऊन जायचा आमचा अजेंडा आहे. राममंदिरामुळे महिला वर्ग आपल्यासोबत येतील, इन्फ्रास्ट्रक्चरमुळे युवा वर्ग आपल्यासोबत येतील, अशी भाजपला वाटत आहे. पण आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी, गोरगरीब, दारिद्र्यरेषेखाली लोकांची संघटना बांधली तर आम्ही या सुटबुटवाल्यांना अडवू शकतो. यामध्ये आम्हाला यश येईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

(Edited by Amol Sutar)

R

Prithviraj Chavan
Bachchu Kadu : लोकसभेत सगळ्या जागा भाजप लढवेल, बच्चू कडूंचा खळबळजनक दावा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com