Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाणांचा प्रकाश आंबेडकरांना 'ग्रीन सिग्नल'; पण ठेवली मोठी अट...

Prakash Ambedkar, INDIA : पंतप्रधान मोदींचा पराभव आणि संविधान वाचवण्यासाठी आंबेडकरांची गरज
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभेत काहीही करून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी महायुतीसह इंडिया आघाडीचीही महत्वकांक्षा आहे. यातूनच या दोन्ही गटांनी आपल्यासोबत इतर लहान-मोठे पक्ष आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

निवडणूक जवळ येऊ लागल्याने राज्यात महाविकास आघाडीच्या दारात उभे असलेल्या प्रकाश आंबेडकारांना काँग्रेसकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी आंबेकरांना सशर्त आघाडीत घेण्याचे संकेत दिले आहेत.

Prithviraj Chavan
Milind Deora : लोकसभा की राज्यसभा; आता मिलिंद देवरांच्या उमेदवारीचा प्रश्न कायम...

प्रकाश आंबेडकार (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन पक्षामुळे २०१९ मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा फटका बसला होता. तसेच आंबेडकर उघडपणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर सडेतोड टीका करत होते. यातून उद्धव ठाकरे सकारात्मक असले तरी आंबेडकरांना महाविकास आघाडीत येण्यासाठी अनेक महिने ताटकळत उभे राहावे लागले आहे. दरम्यान, लवकर निर्णय झाला तर ठीक, अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचा इशाराही आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला होता.

Prithviraj Chavan
Marathwada Water Crisis : दुष्काळात तेरावा महिना; राजेश टोपेंनी थेट मुद्द्यावरच बोट ठेवलं

आंबेडकांच्या 'इंडिया'त सहभागाबाबत पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) म्हणाले, '२०१९ साली आंबेडकरांच्या यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तब्बल नऊ जागांवर फटका बसला. परिणामी महायुतीच्या खात्यात अधिकच्या नऊ खासदारांची भर पडली. आता मात्र, प्रकाश आंबेडकर 'इंडिया' आघाडीबरोबर येतील.'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव आणि देशाचे संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचा पक्ष इंडिया बरोबर असला पाहिजे. लहान-मोठ्या पक्षांना बरोबर घेऊन भाजपविरोधातील मतांचे विभाजन टाळणे गरजेचे आहे,' असेही चव्हाणांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंबेडकर आघाडात येण्याचे संकेत देतानाच चव्हाणांनी मोठी अटही ठेवली आहे. चव्हाण म्हणाले, 'राज्यातील संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्षाशी चर्चा करणे गरजेचे असल्याचीच माझी भूमिका आहे. आता आंबेडकरांनी स्वतः ‘इंडिया’ आघाडीचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घ्यावी. इंडियातील आंबेडकरांच्या सहभागाला कुणाचाही विरोध नाही. त्यांनी मात्र, निवडणुकीत मतांची टक्केवारी, निवडून येण्याची क्षमता पाहूनच जागांची मागणी करावी,' याचीही आठवण करून देण्यास चव्हाण विसरले नाहीत.

(Edited by Sunil Dhumal)

Prithviraj Chavan
Rahul Narwekar : ठाकरे गटाने केलेल्या आरोपांचा नार्वेकरांनी एका वाक्यातच निकाल लावला; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com