Solapur Dcc Bank : अक्कलकोटच्या सहकाराचा कॅप्टन 48 वर्षांनंतर बदलणार : सिद्रामप्पा पाटलांच्या मोठ्या इनिंगनंतर कल्याणशेट्टींची DCC त होणार एन्ट्री

Sachin Kalyanshetti : अक्कलकोटच्या सहकार क्षेत्रात मोठा राजकीय बदल होण्याची शक्यता आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी सोसायटी मतदारसंघातून डीसीसी बँकेत येण्याची शक्यता असून पाटील परिवाराचा 48 वर्षांचा वारसा बदलणार आहे.
siddaramappa patil-sachin kalyanshetti
siddaramappa patil-sachin kalyanshettiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 August : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकपद मिळविणे की तालुक्याची आमदारकी मिळविणे, यापैकी सोपे काय? याचे कोडे अनेकांना अजूनही सुटलेले नाही. अक्कलकोटच्या राजकारणात तर ते आणखी गहन आहे. अक्कलकोटमधून एकदा आमदारकी मिळविलेल्या (स्व.) सिद्रामप्पा पाटील यांनी तब्बल ४० वर्षे तालुक्यातून जिल्हा बँकेचे संचालकपद भूषविले आहे. त्यानंतर त्यांचे चिरंजीव शिवानंद पाटील हे २०१५ मध्ये संचालक झाले. आता अक्कलकोटमधील सोसायटी मतदारसंघातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या रूपाने पाटील परिवाराशिवाय नवा चेहरा डीसीसीमध्ये दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तालुक्यातील सहकाराचा वारसा तब्बल ४८ वर्षांनी बदलत आहे.

अक्कलकोट तालुक्याच्या सोसायटी मतदारसंघातून शिवलिंगप्पा केसूर यांनी १९६५ ते १९७७ या कालावधीत बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले. केसूर यांना संचालक होता आले. मात्र, आमदार होता आले नाही. त्यानंतर (स्व.) सिद्रामप्पा पाटील यांनी १९७८ ते २०१५ या कालावधीत अक्कलकोट तालुक्यातून संचालकपद भूषविले. आमदार कोणीही असो, जिल्हा बँकेचे परमनंट संचालक म्हणून (स्व) सिद्रामप्पा पाटील यांची ओळख होती.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्येच तालुक्याच्या सहकारात सुप्तपणे शिरकाव केला. त्यातूनच त्यांना दुधनी आणि अक्कलकोट बाजार समितीमध्ये यश मिळण्यास मदत झाली. अक्कलकोट तालुक्यात ९३ सोसायट्या असून, त्यापैकी ८९ सोसायट्या मतदानास पात्र ठरल्या आहेत. पाटील यांच्या गटातील बहुतांश कार्यकर्ते यापूर्वीच आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे दाखल झाल्याने तालुक्याच्या सहकारात त्यांचे एकहाती वर्चस्व आहे.

आमदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये कल्याणशेट्टी यांनी नव्या ४० सोसायट्यांची स्थापना केली आहे. सहकारातील ही मुहूर्तमेढ रोवताना त्यांना डीसीसीचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि शिवानंद पाटील यांच्या गटाचे हसापुरे यांच्यावर विशेष लक्ष असल्याचे दिसते. या पार्श्‍वभूमीवर यंदा दक्षिण सोलापूरचीही निवडणूक चुरशीची ठरू शकते.

siddaramappa patil-sachin kalyanshetti
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंना गांभीर्य कळतच नाही; त्यांनी आपल्या भविष्याची चिंता करावी : भाजप नेत्याचा सल्ला

भाजपला केलेल्या मदतीतून म्हेत्रेंना संधी

यापूर्वी २०१५ मध्ये जिल्हा बँकेची निवडणूक आणि विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जवळपास एकाच वेळी झाली होती. त्यावेळी विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार प्रशांत परिचारक यांना विजयासाठी अक्कलकोटचा आशीर्वाद महत्त्वाचा होता. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना डीसीसीचे संचालकपद हवे होते.

siddaramappa patil-sachin kalyanshetti
Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेवरील निलंगेकरांचे आरोप हवेतच विरले; सहकार मंत्र्यांच्या प्रशस्तीपत्रामुळे भाजप नेत्याची नामुष्की!

त्यावेळी भाजपसोबत झालेल्या तडजोडीत (स्व.) सिद्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव शिवानंद पाटील हे सोसायटी मतदारसंघातून, तर म्हेत्रे हे इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक झाले. मात्र, अवघ्या दोन-अडीच वर्षांत संचालक मंडळ बरखास्त झाल्याने या संचालक मंडळाला उल्लेखनीय काम करता आले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com