
ओबीसी–मराठा वादावर प्रश्नचिन्ह – बच्चू कडू यांनी विचारले की मुख्यमंत्री फडणवीस इतके हुशार असूनही ओबीसी व मराठा वाद का मिटवत नाहीत, यामागे सत्तेचे राजकारण असल्याचा आरोप केला.
शेतकरी व आर्थिक असंतोष – शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी, सोयाबीनला भाव नाही, आत्महत्या वाढल्या आहेत; सरकार लोकांचा पैसा तिजोरीत घेऊन अन्यत्र खर्च करत असल्याची टीका केली.
जातीय राजकारणावर हल्ला – समाजात ओबीसी, मराठा, दलित, मुस्लिम असे वेगवेगळे झेंडे फडकवून लोकांमध्ये भांडण घडवले जात आहे; शेतकऱ्यांसाठी कोणी बोलत नाही, असे ते म्हणाले.
Solapur, 16 September : तुम्ही सरकारसोबत न भांडता आपपसांत भांडलं पाहिजे, असं सगळं षडयंत्र सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि वकील आहेत. सत्ता कशी टिकवायची, खुर्चीवर कसं बसायचं, हे सगळं त्यांना माहिती आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारानंतर तेच हुशार आहेत, असं म्हणतात. मग ओबीसी आणि मराठा वाद का संपवता येतं नाही? असा खडा सवाल माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.
सोलापूर दौऱ्यावर आलेले बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची सभा झाली. त्या सभेत बोलताना माजी आमदार कडू यांनी फडणवीस आणि सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव काय आहेत, पाहा. कष्ट करून मालाला भाव मिळतं नसेल तर काय फायदा? तुम्ही कोणत्या जातीच्या व्यासपीठावर दिसणार का? असा सवाल मला विचारण्यात आला होता, त्यावेळी ठणकाहून सांगितलं की, मी शेतकरी आणि दीन दलितांच्या भल्यासाठी लढेन. सगळे जातीसाठी लढत असतील तरी आम्ही शेतकऱ्यांसाठी लढू.
शिवाजी महाराजांनी वतनदारी नष्ट करण्यासाठी तलवार उचलली होती. आज संविधन धोक्यात येतं की काय अशी स्थिती आहे. भाजपच्या (BJP) काही नेत्यांना मग्रुरी आली आहे. येणारी 28 ऑक्टोबर ही तारीख राज्यासाठी निर्णायक असेल. गावागावांत पार्टीचे तरुण जातीचे झेंडे घेऊन उभे आहेत. झेंडा जरी तुमच्या हातात असला तरी त्याच्या कपड्यासाठी कापूस शेतकरी पिकवतो, हे लक्षात ठेवा, असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले.
राज्यात साडेसहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणारा शेतकरी हा एका जातीचा नसतो. सरकार असंच वागणार असेल तर नेपाळसारखी परिस्थिती देशात निर्माण होईल.
आमच्या खिशातून पैसा काढला जातो आणि सरकारच्या तिजोरीत भरला जातो. तिजोरीतला तो पैसा ‘शक्तीपीठ’साठी खर्च केला जातो. सकाळी ओबीसी नेता बोलतो, दुपारी मराठा, संध्याकाळी पुन्हा दलित बोलतो, मग मुसलमान नेता बोलतो. शेतकऱ्यांसाठी कोण बोलणार, असा सवालही बच्चू कडू यांनी केला.
बच्चू कडू म्हणाले, आम्ही वेदनेच्या लोकांचे दुःख मांडणाऱ्या सभा घेण्यादाठी आलो आहे, त्यामुळे आजपासून हे सगळे सत्कार, हार तुरे फटाके सगळे काही बंद केलं पाहिजे. मला माहिती तुमचा (कार्यकर्त्यांचे) जास्त फायदा यामध्ये नाही. पण फायदा नाही म्हणून दिशा बदलली नाही पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही लोकांनी निवडणुकीत पाडलं. शरद जोशींसारख्या नेत्यालादेखील केवळ जोशी आहेत म्हणून तिथल्या शेतकऱ्यांनी पाडलं.
प्र.1: बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीसांबाबत काय टीका केली?
उ. – फडणवीस सत्ता टिकवण्यात हुशार आहेत पण ओबीसी–मराठा वाद संपवू शकत नाहीत,
प्र.2: शेतकऱ्यांच्या समस्येबाबत त्यांनी काय सांगितले?
उ. – सोयाबीनसह पिकांना योग्य भाव नाही, सरकारचा पैसा शेतकऱ्यांवर न वापरता इतर ठिकाणी खर्च होतो, असा आरोप केला.
प्र.3: राज्यातील जातीय वातावरणाबाबत त्यांचे मत काय आहे?
उ. – राजकीय पक्ष जाणूनबुजून जातींमध्ये फूट पाडत आहेत, परंतु शेतकऱ्यांसाठी कोणी लढत नाही, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.