Maharashtra Ekikaran Samiti : सीमा लढ्याबाबत महाराष्ट्राची भूमिका बदलली काय? महाराष्ट्र एकीकरण समितीचा कोल्हापुरातील आंदोलनात सवाल

Kolhapur News : बेळगाववासियांचा महाराष्ट्रात समावेश होण्यासाठी 1956 पासून लढा सुरू आहे. या लढ्यात त्यावेळी पाच जण हुतात्मा झाले आहेत. सलग 69 वर्षे उलटूनही सातत्याने सीमावासीय आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
Maharashtra Ekikaran Samiti Agitation
Maharashtra Ekikaran Samiti AgitationSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 17 January : महाराष्ट्रात सामील होण्यासाठी बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीची गेल्या अनेक वर्षांपासून धडपड सुरू आहे. मात्र, या मागणीकडे आता महाराष्ट्र सरकारनेदेखील दुर्लक्ष केले आहे, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने आता कर्नाटक सोडून थेट महाराष्ट्रातच आंदोलन सुरू केले आहे. सीमा भागातील अनेक जिल्ह्यांत एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याबाबत दुर्दैवाने महाराष्ट्राची भूमिका बदलली की काय? अशी विचारणा महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.

बेळगाववासियांचा (Belgaum) महाराष्ट्रात समावेश होण्यासाठी 1956 पासून लढा सुरू आहे. या लढ्यात त्यावेळी पाच जण हुतात्मा झाले आहेत. सलग 69 वर्षे उलटूनही सातत्याने सीमावासीय आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. कर्नाटक सरकारला धारेवर धरत मोर्चे, आंदोलन करत बेळगावमधील सीमावासियांचा महाराष्ट्रात समावेश करावा, ही मागणी करत आहेत.

सुरुवातीला 2000 मध्ये आघाडी सरकारच्या काळात दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांना घेऊन केंद्र सरकारच्या मदतीने हा प्रश्न मिटवावा, यासाठी प्रयत्न झाले. मात्र, त्याला अपयश आल्यानंतर 2004 मध्ये यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील केली गेली. साक्षी, पुरावे सादर केल्यानंतर 2014 मध्ये सुनावणी झाली. मात्र, त्यानंतर महाराष्ट्राची सरकारची (Maharashtra Government) भूमिका सीमा भागासाठी तत्पर दिसली नसल्याचा आरोप या वेळी एकीकरण समितीने केला आहे.

Maharashtra Ekikaran Samiti Agitation
Chandrashekhar Bawankule : बावनकुळे ॲक्शन मोडवर; पालकमंत्रिपदाच्या भूमिकेतून नागपुरात बैठकांचा धडका!

सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली आहेत. हा प्रश्न 69 वर्षांपासून प्रलंबित असल्याने महायुती सरकारने केंद्र आणि कर्नाटकच्या मध्यस्थीने हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.

Maharashtra Ekikaran Samiti Agitation
Konkan Politics : कोकणातील ठाकरे गटाचा बडा मासा शिंदेच्या गळाला; उदय सामंतांनी प्रवेशाची डेडलाईनच सांगितली

वकिलांमार्फत सीमा प्रश्नाचा निकाल लवकर लावावा, यासाठी हालचाली कराव्यात, ही मागणी एकीकरण समितीने केली असून, त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना समितीच्या वतीने देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com