Chandrashekhar Bawankule : बावनकुळे ॲक्शन मोडवर; पालकमंत्रिपदाच्या भूमिकेतून नागपुरात बैठकांचा धडका!

Vidarbha Political News : सध्या नागपूर महापालिकेवर प्रशासक आहे. त्यांचे आणि भाजपच्या नेत्यांचे फारसे पटत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा त्यांना बदलण्याची मागणी केली आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 17 January : महायुतीचे सरकार स्थापन होऊन सुमारे एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा झालेली नाही. नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती होण्याची अधिक शक्यता आहे. बावनकुळे यांनीही आपल्या बैठका आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून आपणच नागपूरचे पालकमंत्री होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज (ता. 17 जानेवारी) शुक्रवारी जिल्हा परिषद, नागपूर महापालिका, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभागात बैठका लावल्या आहेत. या माध्यमातून ते तीनही विभागाच्या कार्याचा आढावा घेणार आहेत. नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ आज संपणार आहे. येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

बावनकुळे यांची राजकीय कारकीर्द नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेपासूनच सुरुवात झाली. ते दोन वेळा जिल्हा परिषदेत निवडून आले होते. विरोधी पक्षनेते होते, त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाची बारीकसारिक माहिती आहे. विधानसभा जिंकल्यानंतर नागपूर जिल्हा परिषद भाजपला आपल्या ताब्यात घ्यायची आहे. ग्रामीण भागतील त्यांचा संपर्क बघता ही जबाबदारी त्यांच्यावरच येणार आहे, त्यामुळे त्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chandrashekhar Bawankule
Konkan Politics : कोकणातील ठाकरे गटाचा बडा मासा शिंदेच्या गळाला; उदय सामंतांनी प्रवेशाची डेडलाईनच सांगितली

बावनकुळे महापालिकेचाही आढावा घेत आहेत. सध्या नागपूर महापालिकेवर प्रशासक आहे. त्यांचे आणि भाजपच्या नेत्यांचे फारसे पटत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा त्यांना बदलण्याची मागणी केली आहे. फडणवीस आणि गडकरी यांच्या कामाचा वेगाच्या तुलनेत महापालिका आयुक्त आणि प्रशासक अभिजित चौधरी स्लो असल्याचे भाजपच्या नेत्यांचा आरोप आहे. महापालिकेच्या निवडणुकीला भाजपला सामोरे जायचे असल्याने बावनकुळे आज काय निर्देश देतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात बावनकुळे हे ऊर्जा मंत्री होदते. त्यांना नागपूरचे पालकमंत्री करण्यात आले होते. या पाच वर्षांत त्यांनी ऊर्जावान मंत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली हेाती. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी नागपूरमध्ये झालेल्या एका बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा ऊर्जावान मंत्री असाच उल्लेख केला होता.

Chandrashekhar Bawankule
Dhananjay Munde News : धनंजय मुंडे गोत्यात? हायकोर्टाने जुन्या प्रकरणात सरकारला दिले आदेश

अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा बावनकुळे यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांची वेव्हलेंथ चांगलीच जुळली आहे. महसूलमंत्री करून फडणवीस यांनी त्यांना बढती दिली आहे. हे सर्व बघता नागपूर जिल्ह्याचे पालकत्व बावनकुळे यांच्याकडे सोपवले जाणार असल्याचे जवळपास ठरले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com