Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील संघर्ष समितीचा एल्गार, घेतला 'हा' मोठा निर्णय

Shaktipeeth Mahamarg Latest News : केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वकांशी प्रकल्प असणारा राज्यातील शक्तिपीठ महामार्गाला विरोधाचे सूत्र सुरूच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातून या महामार्गाची अधिसूचना रद्द करण्यात आली होती.
Shaktipeeth Mahamarg Latest News
Shaktipeeth Mahamarg Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 17 Jan : केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वकांशी प्रकल्प असणारा राज्यातील शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Mahamarg) विरोधाचे सूत्र सुरूच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातून या महामार्गाची अधिसूचना रद्द करण्यात आली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतेच या शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला हिरवा कंदील दिल्यानंतर सांगलीसह उर्वरित 12 जिल्ह्यातील जमीन अधिग्रहण करण्यासाठी सुरुवात झाली आहे. मात्र, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध डावलून सरकारने प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीत पुन्हा एकदा बारा जिल्ह्यातील संघर्ष समितीकडून आंदोलनाचा नारा देण्यात आला आहे. शक्तिपीठ महामार्गाविरोधात येत्या 24 जानेवारी रोजी राजव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार या ऑनलाइन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शक्तिपीठ ज्या बारा जिल्ह्यातून जातो त्या बारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.

Shaktipeeth Mahamarg Latest News
Narendra Modi : 'स्थानिक'साठी महायुतीत स्वबळाचं टुमकं वाजवणाऱ्यांना PM मोदींचा मोठा झटका; मित्रपक्षांना सांभाळण्याचा का दिला सल्ला...

त्या संदर्भात 12 जिल्ह्यातील संघर्ष समितीचे आणि लोकप्रतिनिधींची बैठक ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे होते. विधानसभा निवडणुकीत केवळ कोल्हापुरातूनच (Kolhapur) विरोध होत आहे. म्हणून राज्य सरकारने असा खोटावा देखावा करून कोल्हापुरातील अधिसूचना रद्द केली.

Shaktipeeth Mahamarg Latest News
Nagpur News : आतातरी गडकरी अन् फडणवीस पूर्ण ताकद लावणार; 20 वर्षांपासूनचा रखडलेला 'तो' प्रकल्प पूर्ण होणार?

इतर जिल्ह्यातून कोणताच विरोध नसल्याचे राज्य सरकारने दाखवले. असा खोटा प्रकार करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. मात्र इतर सर्वच जिल्ह्यात आंदोलन सुरू होती. राज्य सरकारला केवळ ठेकेदारांचे भले करण्यासाठी आणि उद्योगपतींना नैसर्गिक साधन संपत्ती खनिज संपत्ती लुटीसाठी हा महामार्ग केला जात असल्याचा आरोप गिरीश फोंडे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com