Ahmednagar News : अबब! चक्कं अहमदनगर जिल्हा परिषद सीईओ येरेकरांचे अकाऊंट हॅक; सायबरकडे तक्रार दाखल!

Zilha Parishad News : येरेकर यांचे अकाऊंट हॅक करून हॅकरने आनेकांना विविध प्रकारचा गंडा घातला ...
Ashish Yerekar
Ashish YerekarSarkarnama
Published on: 
Updated on: 

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (Ashish Yerekar) यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येरेकर यांचे अकाऊंट हॅक करून हॅकरने अनेकांना विविध प्रकारचा गंडा घातला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सीईओ आशिष येरेकर यांनी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Latest Marathi News)

Ashish Yerekar
Maharashtra Politics : राज्यात तिसऱ्या भूकंपाची शक्यता; 'या' कारणामुळे खातेवाटप आणि विस्तार रखडल्याची चर्चा

नामांकित लोकांची सोशल अकाऊंट हॅक करून लोकांना लुबाडण्याचे प्रकार सध्या सर्रास होताना दिसून येत आहेत. यातून अकाऊंट हॅक झालेल्या व्यक्तिची आर्थिक फसवणूक तसेच सामाजिक प्रतिमा बिघडवण्याचे काम अनेकजण जाणीवपूर्वक करतानाही आढळून आले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या सायबर सेलकडून अकाऊंट धारकांना वेळोवेळी सूचना करून काळजी घेण्याचे सांगितले जाते.

मात्र सराईत हॅकर काही न काही त्रुटी शोधून विविध मार्गांनी अनेकांची सोशल मीडिया अकाउंट हॅक करतात. यावर आळा घालून गुन्हेगारांना शोधून कारवाईसाठी आता गृह विभागाने स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशनही सुरू केली आहेत.

अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांच्या नावे सोशल मीडियावर बनावट खाते उघडून अनेकांना पैशाची मागणी वा इतर मदत मागण्यांचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अशा तोतयांपासून सावध राहण्याचे आवाहन सीईओ येरेकर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप या व अशा अनेक सामाजिक माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे, तसेच जिल्हा परिषदेच्या इतर अधिकाऱ्यांचे बनावट खाते निर्माण करून त्याव्दारे सामान्य जनतेला पैशाची मागणी करणे, वैद्यकीय मदत मागणे किंवा सैन्य दलातील मित्र आजारी आहे त्याला मदत करणे, असे भावनिक संदेश टाकून त्यासाठी आर्थिक मागणी केली जात आहे.

Ashish Yerekar
Kukadi Water : आता बोगदा कसा होणार ; कुकडीचे पाणी पेटणार ? ; डावा कालवा सत्ताधाऱ्यांचा झाला..

अशा अनेक सोशल अकाऊंट हॅक करून बनावट घटना घडत असल्याबाबत जिल्हा परिषदेकडे माहिती आली होती. त्यामुळे सीईओ येरेकर यांनी सायबर सेल कडे तक्रार दाखल केली. तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही सामाजिक माध्यमाच्या संदेशाच्या प्रलोभनास बळी पडून आपले नुकसान करून घेऊ नये. तसेच अशा कोणत्याही बनावट खात्याशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा संबंध नाही. त्यामुळे याबाबत सर्व नागरिक व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.