
Ahmednagar Politics: अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या नावाला आम्ही विरोध करणार नाही. कारण होळकर या शूरवीर होत्या, लढवय्या होत्या. पण इंदोरला त्यांचे लढाऊ वास्तव्य गेले. वास्तविक पाहता त्या नगरीला त्यांचे नाव दिले गेले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार आणि जेष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी केली. नगरचे नामांतर म्हणजे एक प्रकारे ओबीसी समाजालाच आरक्षण देण्याचा मुद्दा बाजूला ठेवून अशा प्रकारचे गाजर दिले गेले, अशी टीकाही दलवाई यांनी यावेळी केली.
हुसेन दलवाई रविवारी अहमदनगर दौऱ्यावर आले होते. '' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या घोषणे मागे अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा दाखला भाजप-शिंदे शिवसेनेकडून देण्यात येत असला तरी यामागे जातीय मतांचे राजकीय गणित लपले आहे, हे उघड आहे, याकडे दलवाई यांनी लक्ष वेधले.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, ठाकरे शिवसेना (Uddhav Thackeray) आदी सर्व पक्षांकडून स्वागत करण्यात आले. मात्र त्याच वेळी विरोधी पक्षांनी धनगर आरक्षणाबाबत 2014 विधानसभा निवडणुकी वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला भाजप सरकार येताच आरक्षणाचे आश्वासन पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले होते, पण ते आश्वासन अजूनही पूर्ण झाले नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. याची आठवण करून देत आश्वासन अद्याप न पाळल्याबद्दल टीकाही करण्यात आली.
मोदी सरकारच्या (Modi Govt) नऊ वर्षाच्या एकूण कार्यकालाबद्दल भाजप कडून सोहळे साजरे केले जात असल्यावरही त्यांनी यावेळ टीका केली. गेल्या नऊ वर्षांत या सरकारने नेमके सर्वसामान्य जनतेला काय दिले हे सांगावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच, मन की बात ही फक्त तुमच्या पुरतीच मर्यादित राहिली, त्याचा सर्वसामान्यांना काय उपयोग झाला, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
याचवेळी त्यांनी शेवगावच्या दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. शेवगाव शहरात घडलेली दंगल या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप दलवाई यांनी यावेळी केला. पोलिसांनी त्या ठिकाणी पुन्हा दहशत करून सर्वसामान्यांना वेठीस धरले आहे. या दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांना करणार असल्याचे दलवाई यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना केली. शेवगाव तालुक्याच्या घडलेल्या प्रकारामध्ये संबंधित पोलीस निरीक्षकाला देखिल तात्काळ निलंबित करावे अशीही मागणी त्यांनी केली.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.