KP Patil trouble : अजितदादांच्या 'त्या' सल्ल्याने के.पी. पाटलांची कोंडी; ठाकरेंना सोडण्याचा निर्णय राजकीय आत्महत्या ठरणार?

KP Patil Politics News : विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटात गेलेल्या माजी आमदार के पी पाटील यांची पुन्हा एकदा घरवापसीची चर्चा सुरू आहे.
KP Patil faces political uncertainty after Ajit Pawar advises him to pause, with risks looming over his ties with Uddhav Thackeray.
Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Advice to KP Patil : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी के. पी. पाटील यांना तुम्ही 2029 मध्ये 84 वर्षांचे होणार आहात. आता निवृत्त व्हा आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्या, असे म्हंटले होते. त्यामुळे के.पी. पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश थांबल्याची चर्चा थांबल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे के पी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

मात्र ठाकरे गटातूनही त्यांच्याविरोधात आवाज उठवला जात आहे. त्यांची तक्रारही उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. त्यामुळे एकीकडे अजितदादांनी थांबण्याचा सल्ला दिलेला असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय हा के. पी. पाटील यांच्यासाठी राजकीय आत्महत्या ठरण्याची शक्यता दिसत आहे.

KP Patil faces political uncertainty after Ajit Pawar advises him to pause, with risks looming over his ties with Uddhav Thackeray.
KP Patil News : के.पी. पाटलांचा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार; पदाधिकाऱ्यांकडून उघडपणे नाराजी व्यक्त!

शरद पवारांची राष्ट्रवादी व्हाया ठाकरे गट अन् आता अजितदादांची राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास के.पी पाटील यांचा आहे. माजी आमदार असलेले पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर लगेचंच शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर येताच पाटील यांनी त्यांचंही स्वागत केलं.

KP Patil faces political uncertainty after Ajit Pawar advises him to pause, with risks looming over his ties with Uddhav Thackeray.
Kolhapur Politics : "तुम्ही 84 वर्षाचे होणार, रिटायरमेंट घ्या अन्..."; ठाकरे गटातून राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या के.पी पाटलांना अजितदादांनी सुनावलं

शिवाय तुम्ही कोणत्या गटाचे? असं विचारतात त्यांनी मी पवार गटाचा आहे, असं उत्तर दिलं होतं. दरम्यान, विधानसभेला राधानगरी भुदरगडची जागा महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला जाताच के.पी पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता ते आता पुन्हा एकदा अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.

विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटात गेलेल्या माजी आमदार के पी पाटील यांची पुन्हा एकदा घरवापसीची चर्चा सुरू आहे. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असता के पी पाटील हे अजित पवारांसोबत दिसले. त्यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गट चांगलाच संतापला आहे.

KP Patil faces political uncertainty after Ajit Pawar advises him to pause, with risks looming over his ties with Uddhav Thackeray.
blackout precautions : शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण कसे कराल अन् 'ब्लॅकआउट'मध्ये नेमके काय करायचं?

माजी आमदार के पी पाटील यांच्या विरोधात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त करताच सहसंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी के. पी. पाटील यांची तक्रार थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच करणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आज(गुरूवार) कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात के पी पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे दिसून आले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com