Yavatmal Shiv Sena : खासदार भावना गवळींवर किरीट सोमय्यांचा पुन्हा पलटवार

Kirit Somaiya : सव्वा आठ कोटींची संपत्ती आपल्याच तक्रारीवरूनच जप्त झाल्याचा दावा
Kirit Somaiya & Bhavana Gawali
Kirit Somaiya & Bhavana GawaliSarkarnama
Published on
Updated on

Action on Bhawana Gawali : वाशीम येथील महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये 19 कोटींचा घोटाळा झाला. या घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा अलीकडेच खासदार भावना गवळी यांनी माध्यमांपुढे केला. मात्र भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या घोटाळ्यात खासदार गवळी या सहभागी होत्या. आपल्याच तक्रारीवरूनच त्यांना आयकर विभागाने तब्बल सव्वा आठ कोटींचा दंड ठोठावल्याचा दावा केला आहे. सोमय्या यांच्या विधानानंतर आता पुन्हा यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात विविध चर्चांना पेव फुटले आहेत.

सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्यासह अनेकांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर मुश्रीफ हे शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये मंत्री झालेत. तर गवळी या शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या. पुढे त्यांच्या चौकशीची कारवाई संथ झाल्याचे दिसले.

Kirit Somaiya & Bhavana Gawali
Yavatmal Mahayuti : भावना गवळींचा पत्ता कापण्याचा इंद्रनिल नाईकांचा असाही प्रयत्न

यासंदर्भातील प्रश्न पिंपरी-चिंचवडमध्ये किरीट सोमय्या यांना प्रसार माध्यमांनी विचारला. त्यावर किरीट सोमय्या म्हणाले की, ज्या तक्रारी आपल्याकडून झाल्या. त्यामध्ये आपण केलेल्या विविध तक्रारीत 100 टक्के तथ्य आढळले आहे. या तक्रारी खऱ्या निघाल्या आहेत. 39 घोटाळे आपण बाहेर काढले. त्या सगळ्यांची चौकशी पुढे झाली, काहींची सुरू आहे.

कोणाची मालमत्ता यंत्रणांनी जप्त केली. कुठे अद्यापही चौकशी सुरू आहेत. काहींमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. मुश्रीफ यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. पुढचा निर्णय न्यायालय घेईलच. न्यायालयापर्यंत पोहोचविण्याचे आपले काम आहे. न्यायालयात जावून काळा कोट घालून आपण उभे राहू शकत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार भावना गवळी यांची सव्वा आठ कोटींची मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली असल्याचेही किरीट सोमय्या म्हणाले. त्यांच्या त्या आरोपाचे व्हिडीओ आणि वार्तांकन यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात सोशल मीडियातून विरोधक व्हायरल करीत आहे. विशेष म्हणजे अलीकडेच खासदार भावना गवळी यांनी आपला या घोटाळ्याशी काडीचाही संबंध नसल्याचा खुलासा केला होता.

महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये आपण कुठल्याच पदावर नव्हतो असे त्यांनी म्हटले होते. मात्र आता सोमय्या यांनी केलेल्या या पलटवाराने पुन्हा खासदार भावना गवळी यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. विशेष म्हणजे गवळी महायुतीत आल्यानंतर आता सोमय्या यांनी त्यांच्यावर प्रहार केल्याने हा वाद चिघळणार की काय, असे संकेत आहेत.

Kirit Somaiya & Bhavana Gawali
Yavatmal-Washim LokSabha Constituency : भावना गवळींची ‘जायंट किलर’ उपाधी कायम राहील का?

महायुतीत सामील भाजप, शिवसेना शिंदे गट यासह विविध घटक पक्ष सामील आहेत. महायुतीतील नेत्यांमध्ये दिलजमाई व्हावी, यासाठी अलीकडेच संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मेळावे घेण्यात आलेत. त्यात प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकमेकांना एकदिलाने सहकार्य करण्याचे मान्य केले. मात्र मेळावे आटोपताच नेते एकमेकांचे उट्टे काढीत आहेत. किरीट सोमय्या यांनी भावना गवळींवर केलेल्या पलटवाराने ते स्पष्ट होते. त्यामुळे महायुतीत दिलजमाई नव्हे बरेच काही आलबेल असल्याचेही दिसून येते.

Edited By : Prasannaa Jakate

Kirit Somaiya & Bhavana Gawali
Yavatmal : विधान परिषदेत वादग्रस्त ठरलेल्या मुख्याधिकाऱ्यावर आमदाराचे जडले प्रेम...!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com