.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सांगली महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
मिरजेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आजम काझी यांच्यासह आठ जणांवर हद्दपारीची कारवाई झाली.
अजित पवारांच्या उद्याच्या मिरज दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
Sangli NCP Politics News : राज्यभर महापालिका निवडणुकींच्या प्रचाराचा धुरळा उडत असतानाच गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर जोरदार टीकेला सामोरं जावं लागले आहे. अशातच अजितदादांना सांगलीत मोठा धक्का बसला आहे. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीच्या उमेदवारावरच पोलिसांनी हद्दपारची कारवाई केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून मिरज महानगरपालिकेसाठी प्रभाग सहामधील उमेदवार आजम काझी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. काझी यांच्याबरोबर आठ जणांच्यावर ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान काझी यांनी या कारवाईबाबत भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव घेतल्याने मिरजेतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच राष्ट्रवादीने गु्न्हेगारांना उमेदवारी देवून एकच खळबळ उडवून दिली. महापालिकेच्या निवडणुकीत पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने गुन्हेगारी जगताशी संबंधित बंडू आंदेकर याच्या पत्नी आणि सून यांना उमेदवारी दिली.
आंदेकर याच्या पत्नी आणि सून खंडणीप्रकरणी सध्या तुरुंगात असून त्यांना भवानीपेठमधून अधिकृत उमेदवारी अजितदादांनी दिली आहे. त्याचबरोबर गजा मारणेच्या पत्नीला देखील राष्ट्रवादीनं एबी फॉर्म दिला असून वनराज आंदेकरच्या हत्येचा आरोप असलेला गुंड गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकरला निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे. या यादीमुळे वाद निर्माण झाला आहे.
अशातच आता शुक्रवारी (9 जानेवारी) मिरजमध्ये होणार्या जाहीर सभेच्या आधीच अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वसाधारण गटातील उमेदवार आझम काझी यांच्यासह आठ जणांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आलीय. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार, आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन आणि विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघावर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली असून यात आझम काझी यांचा समावेश आहे. तर या कारवाईबाबत लीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हे आदेश दिले आहेत.
आता या कारवाईवरून आजम काजींकडून भाजपवर आरोप करण्यात आला असून त्यांनी थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव घेतले आहे. त्यांनी, ही कारवाई भाजपकडून राजकीय सुडबुद्धीतून करण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच प्रभाग सहामधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होणार असल्यानेच भाजपच्या पायाखालची वाळू सरकरली आहे.
यातूनच घाबरलेल्या भाजपने आपल्यावर सत्तेचा दुरूपयोग करून कारवाई केली आहे. तर नुकताच सांगलीतल्या एका सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृह मंत्रालय आपल्याकडे असल्याचे सांगत इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतरच आता माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावा काजींकडून करण्यात आला आहे.
आता या कारवाईवरून उद्या होणाऱ्या सभेत अजित पवार कोणती प्रतिक्रिया देतात? ते चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्यासह त्यांनी केलेल्या टीकेला कसे उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे. पण ही ऐन निवडणुकीत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मिरजेतील राजकीय वर्तुळाचे तापमान चांगलेच तापले आहे.
1. ही कारवाई कुठल्या निवडणुकीदरम्यान झाली?
सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान.
2. हद्दपारीची कारवाई कुणावर झाली?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आजम काझी यांच्यासह आठ जणांवर.
3. आजम काझी कोणत्या प्रभागातून उमेदवार होते?
मिरजेतील प्रभाग क्रमांक सहा.
4. ही कारवाई कधी करण्यात आली?
ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत, अजित पवारांच्या मिरज दौऱ्याच्या आधी.
5. या घटनेचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रचारावर व मतदारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.