Sangli Miraj Kupwad Municipal Corporation
देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या एका शहरापैकी सांगली हे शहर होते. सांगली-मिरज-कुपवाड या तीन शहरांच्या एकत्रित महापालिकेवर 2008 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती. 2013 मध्ये 78 पैकी 45 जागा जिंकून काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर राष्ट्रवादीला 25 जागा मिळाल्या होत्या. 2013 मध्ये मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील यांनी पुन्हा काँग्रेसची सत्ता आणली. 2018 मध्ये मात्र भाजपने तब्बल 41 जागा जिंकून महापालिकेवर एकहाती सत्ता आणली. काँग्रेसला केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागले. सांगलीत मराठा, धनगरांची संख्या लक्षणीय आहे. कुपवाडमध्येलिंगायत, जैन आणि मिरजेत मुस्लिम यांची संख्या निर्णायक आहे. यंदा पुन्हा काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.