Ajit Pawar : लोकसभेतील पिछाडीचा धसका; अजितदादांच्या आमदाराचा जरांगेंच्या मागणीला पाठिंबा!

NCP Ajit Pawar MLA Support To Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : सगे सोयरे या शब्दाचा अंतर्भाव करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत.
Ajit Pawar, Manoj Jarange Patil
Ajit Pawar, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur Political News : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे बसलेला फटका पाहून अनेक आमदार-खासदार खडबडून जागे झाले आहेत. त्यातूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देणारे पत्रकच थेट जाहीर केले आहे.

मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) सगे-सोयरे या शब्दाचा अंतर्भाव करून आरक्षण देण्यात यावे, अशा आशयाचे पाठिंब्याचे पत्र आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांना दिले आहे.

सगे सोयरे या शब्दाचा अंतर्भाव करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत.

त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी राज्य सरकारकडे मराठा समाजाला सगेसोयरे या शब्दाचा अंतर्भाव करून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत पाऊल उचलले आहे. अशी मागणी करणारे आमदार बबनराव शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले आमदार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रात आमदार शिंदे यांनी म्हटले आहे की, मराठा समाज हा पूर्वीपासून आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे, त्यामुळे मराठा समाजातील सर्व तरुण-तरुणींनी प्रत्येक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागत आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी सरकारने मराठा समाजास तातडीने आरक्षण देणे आवश्यक आहे

Ajit Pawar, Manoj Jarange Patil
Raosaheb Danve : महायुतीने तुमचं काम केलं नाही का ? दानवे चांगलेच वैतागले; म्हणाले...

मराठा समाज बांधवांना ओबीसी प्रवर्गातून कुणबी मराठा हे प्रमाणपत्र सगे सोयरे या शब्दांचा अंतर्भाव करून लाभ मिळावा, यासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे. माढा तालुका आणि माढा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे, असेही बबनदादा शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Ajit Pawar, Manoj Jarange Patil
Sharad Pawar On Nilesh Lanke: 'जायंट किलर' ठरलेल्या निलेश लंकेंबाबत पवारांना 'ही' मोठी काळजी; म्हणाले,'दिल्लीत...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com