Sharad Pawar On Nilesh Lanke: 'जायंट किलर' ठरलेल्या निलेश लंकेंबाबत पवारांना 'ही' मोठी काळजी; म्हणाले,'दिल्लीत...'

NCP Sharadchandra Pawar Anniversary Day : भटकती आत्मा अशी त्यांनी मला टीका केली… बरं झालं… आत्मा कायम असतो.. हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही.नकली बापाची संघटना असं प्रधानमंत्र्यांनी बोलायचं असतं ?
Nilesh Lanke, Sharad Pawar
Nilesh Lanke, Sharad PawarSarkarnama

Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुजय विखेंचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या निलेश लंके जायंट किलर ठरले.विखेंच्या बालेकिल्ला समजले गेलेल्या नगर दक्षिण मतदारसंघाला सुरुंग लावत लंकेंनी विजय खेचून आणला.त्यांच्या विजयाची राज्यभर चर्चा झाली. आता त्याच लंकेंबाबत शरद पवारांना एक मोठी काळजी लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या रौप्य महोत्सवानिमित्त नगर येथे शरद पवार गटाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी तुफान फटकेबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीए सरकार आगामी विधानसभा निवडणुका, लोकसभेतील महाविकास आघाडीचं यश अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी रोखठोक मतं व्यक्त केली.याचवेळी त्यांनी नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंचं जाहीर कौतुक करतानाच त्यांच्यावर मिश्किल टिप्पणीही केली.

शरद पवार म्हणाले, नगरच्या लोकांनी निलेश लंके (Nilesh Lanke) यांना निवडून दिले.पण ते लोकसभेत चालले म्हणून मला काळजी आहे.तिथे संसदेत काम केलेल्या जुन्या सहकार्यांना बाकीचे लोकप्रतिनिधी नक्की विचारतील, हे कोणाला आणलं. इथले काही लोक म्हणाले होते, निवडणुकीच्या प्रचारात कुणीतरी म्हटलं होतं, संसदेत इंग्रजी बोलावं लागतं.पण तिथे मराठीत बोलता येतं. तुम्ही हिंदी, इंग्रजीसह आपल्या मातृभाषेत बोलता येतं.तुम्ही मराठी बोला. पण तुम्ही मातृभाषेत काय बोलतील त्याचा भरोसा नाही असं विधान करताच सभागृहात जोरदार हशा पिकला.

आजचा दिवस हा पक्षाचा वर्धापन दिवस आहे… हा आनंद दिवस साजरा करण्यासाठी झालेल्या निवडणुकीत 8 जागा निवडून देऊन या वर्धापन दिनाला साथ दिली. 25 वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना केली.राज्याच्या कनाकोपर्यात पोहचवला… 3 महिन्यांच्या आता सत्तेच्या राजकारणात काम करण्याची संधी दिली.तेव्हापासून 17- 18 वर्ष राज्य आणि केंद्रात काम केले.आजपर्यंत सत्तेत राष्ट्रवादीचा कायमच मोलाचा वाटा होता असेही पवार म्हणाले.

Nilesh Lanke, Sharad Pawar
Nilesh Lanke : खासदार लंकेंना राजभवनात सोडतील का? शशिकांत शिंदे म्हणाले, "पंतप्रधान मोदी देखील..."

'मोदींंच्या शपथविधीला जनतेची संमती...'

पंतप्रधानांनी शपथ घेतली.पण त्यापूर्वी त्यांना जनतेने संमती दाखवली होती का ? बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेतली म्हणून ते पंतप्रधान झाले. निवडणुकीच्या काळात ते भारताचं सरकार म्हणत नव्हते. कायम मोदी सरकार,मोदी की गॅरंटी म्हणायचे.पण लोकांनी त्यांना दाखवून दिलं असा टोलाही त्यांनी लगावला.

प्रधानमंत्री हे देशाचे असतात.एका पक्षाचा नसतो.सगळ्या घटकांचा विचार करायला ते विसरले.त्यांनी मुद्दाम केलं. अल्पंसंख्याक समाज हा महत्वाचा घटक असतो त्यांना विश्वास देण्यात मोदी कमी पडले.मोदी साहेबांनी मर्यादा पाळल्या नाही.हे विसरुन चालणार नाही.टीका आम्ही देखील करतो असेही पवारांनी यावेळी सांगितले. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा राम मंदिराची चर्चा होईल,असं वाटलं. पण राजकारणासाठी त्याचा वापर करुन त्यांनी चुकीचं केलं, त्याची नोंद अयोध्येतील लोकांनी घेतली अशी टीकाही त्यांनी केली.

नकली बापाची संघटना असं प्रधानमंत्र्यांनी बोलायचं असतं ?

भटकती आत्मा अशी त्यांनी मला टीका केली… बरं झालं… आत्मा कायम असतो.. हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही.नकली बापाची संघटना असं प्रधानमंत्र्यांनी बोलायचं असतं ?मात्र, त्यांना तारतम्य राहिलं नाही.माणूस बेफाम आणि अस्वस्थ कसा होतो ते दिसलं असा हल्लाबोलही पवारांनी मोदींवर केला.

Nilesh Lanke, Sharad Pawar
Jayant Patil : 'रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है...'; जयंत पाटलांचा महायुतीला टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com