
Pune News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना बावधन पोलिसांनी अटक केली आहे.वैष्णवीचे सासरा आणि दीर हे गेल्या सात दिवसांपासून फरार होते.अखेर पोलिसांनी शुक्रवारी(ता.23)पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास राजेंद्र हगवणे आणि सुशील याला अटक केली.
या दोघाच्या अटकेनंतर आता वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane Death Case) संशयास्पद मृत्यू प्रकरणीच्या पोलिसांच्या तपासाला वेग येणार आहे. याचदरम्यान,आता वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या निलेश चव्हाणबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचीही पार्श्वभूमी ही पत्नीच्या छळाचीच असल्याचं स्पष्ट झालं आहे.
वैष्णवी हगवणेनं गळफास घेत जीवन संपवल्यानंतर तिचं नऊ महिन्यांचं तान्ह बाळ तिच्या माहेरच्यांना बंदुकीचा धाक दाखवून देण्यास नकार देणाऱ्या निलेश चव्हाणच्या (Nilesh Chavan) अडचणी वाढल्या आहेत. तसेच पोलिसांनी केलेल्या तपासात निलेश चव्हाणचाही इतिहास हा हगवणे कुटुंबासारखाच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणेच नव्हे तर राज्यात खळबळ उडवून दिलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी असलेल्या निलेश चव्हाणनं स्वतःच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचं समोर आलं आहे.त्याने स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्वतःच्याच पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर 2022 साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे वारजे पोलिसांनी आता दुसर्यांदा गुन्हा दाखल केल्यामुळे चव्हाणच्याही अडचणी वाढल्या आहेत.
वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याचा गुन्हा वारजे पोलिस ठाण्यात निलेश चव्हाणवर दाखल झाला आहे. वैष्णवीच्या कस्पटे कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरुन निलेश चव्हाण याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्वेनगर परिसरात राहणार्या निलेश चव्हाणचा बांधकाम व पोकलेन मशिनचा व्यवसाय आहे. तसेच तो नणंद करिश्मा हगवणेचा मित्र असल्याचं समोर आलं आहे. कर्वेनगर परिसरातील औदुंबर पार्क सोसायटीत निलेशच्या वडिलांच्या नावे तीन फ्लॅट असल्याचीही माहिती आहे.
निलेश चव्हाणचं तीन जून 2018 ला लग्न झालं होतं. यानंतर जानेवारी 2019 मध्ये त्याच्या पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला संशयास्पद वस्तू अडकवल्याचा निदर्शनास आलं. याविषयी तिनं निलेशला जाब विचारला. त्यावेळी निलेशनं तिला उडवाउडवीची उत्तरं दिली.
पुढच्याच महिन्यात निलेशच्या पत्नीला पुन्हा एकदा घरातील एसीला काहीतरी संशयास्पद वस्तू अडकवल्याचा लक्षात आलं. त्याहीवेळी निलेशने उडवाउडवीची उत्तर देत वेळ मारुन नेली. पण त्याच्या पत्नीला एकेदिवशी निलेशच्या लॅपटॉपमध्ये दोघांमधील शरीरसंबंधांचे काही व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने रेकॉर्ड केल्याचं दिसून आलं.त्यावेळी तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
यानंतर जाब विचारणाऱ्या पत्नीला घरातील चाकूचा दाक दाखवत तिला धमकावलं तसेच तिचा गळाही दाबत बळजबरीने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. या धक्कादायक प्रकाराची माहिती तिनं निलेशच्या आई -वडिलांसह कुटुंबियांना दिली. पण त्यांनीही निलेशची बाजू घेत पत्नीचाच छळ सुरू केला.
त्यानंतर अखेर निलेशच्या पत्नीनं सततच्या कौटुंबिक छळाला कंटाळून घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात 14 जून 2022 ला गुन्हा दाखल झाला होता. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाकडून फेटाळल्यानंतरही वारजे पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली नव्हती. अखेर मुंबई उच्च न्यायालयानं त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.