NCP Vs Jayant Patil : राष्ट्रवादी राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत? जयंत पाटलांसह विश्वजीत कदमांच्या जवळच्या नेत्यांना फोडण्याच्या रणनीतीला वेग

Ajit Pawar NCP On Mansingrao Naik and JayshreeTai Patil : सांगली जिल्ह्यात आगामी स्थानिकसाठी जोरदार तयारी केली जात असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून महत्वाच्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी रणनीती आखली जातेय.
Jayant Patil, vishwajeet kadam And Ajit Pawar
Jayant Patil, vishwajeet kadam And Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यात आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी येथीच दुष्काळी फोरमचे नेते अशी ओळख असणाऱ्या काही माजी आमदारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठी ताकद मिळाली होती. आता अजित पवार यांची पुन्हा ताकद वाढवण्यासाठी हेच दुष्काळी फोरम रणनीती आखत असून जिल्ह्यातील दोन मोठ्या नेत्यांना फोडण्याची तयारी केली जातेय. यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी पुन्हा एकदा मोठा भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जिल्ह्याच्या नेत्यांकडून खलबत्त केली जातायत. महापालिका, जिल्हा परिषदेबरोबरच आता जिल्ह्या बँकेतही राजकीय ताकद वाढवण्यावर भर दिली जाणार आहे. यासाठी दुष्काळी फोरम अशी ओखळ असणाऱ्या अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्रआण्णा देशमुख, निशिकांत पाटील यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे.

आगामी स्थानिकसाठी येथील विश्रामगृहावर बैठक घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या निकटर्तींयावर लक्ष केंद्रीत केलं आहे. या बैठकीत जिल्हा बँकेचे नेते माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांना फोडण्याचा घाट घालण्यात आला आहे. या दोघांना आपल्यालाबरोबर घेताना जिल्ह्यात मोठा कार्यक्रम घेण्याचेही निशिकांत पाटील यांनी आयोजले आहे.

Jayant Patil, vishwajeet kadam And Ajit Pawar
Jayant Patil : राज्यात दोन्ही राष्ट्रवादीत राजकीय सेटलमेंटची चर्चा? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात मात्र संभ्रमावस्था

माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांना नुकताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत यश आले नाही. त्यांची आतापर्यंतच वाटचाल ही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगतील त्या पद्धतीनेच होत होती. पण आता निकालानंतर पुलाखालून आता बरेचसे पाणी गेलं असून त्यांना ही नव्या सत्तासमिकरणांनुसार निर्णय घ्यावा लागणार आहे. तसा दबावही त्यांच्यावर असल्याची भागात चर्चा आहे.

काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयश्रीताई मदन पाटील यांना पक्षात घेण्यास तयार नाहीत. याबाबत त्यांनी आधीच विरोधाचा पवित्रा घेतला आहे. यामुळे त्या आगामी महापालिकेच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेतात. याकडे सध्या काँग्रेसचे लक्ष लागले आहे. तर काँग्रेसच्या भूमिकेमुळे जयश्रीताई मदन पाटील यांचा गट देखील नाराज आहे. या नाराजीचा अजित पवार गटाला फायदा होऊ शकतो.

अजित पवार यांनी जयश्रीताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तर जुन्या ऋणाबंधानुसार मदन पाटील गट राष्ट्रवादीशी जोडला जावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र तोंडावर विधानसभा असल्याने जयश्रीताईंनी कोणतीच भूमिका घेतली नव्हती. उलट निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत काँग्रेसविरोधात दंड थोपाटले होते. ज्यात त्यांनाही यश आले नाही आणि त्यांच्यामुळे पक्षाचा उमेदवारही पडला. यामुळे जिल्ह्यातील मुळ काँग्रेसमध्ये आजही नाराजी आहे.

Jayant Patil, vishwajeet kadam And Ajit Pawar
Jayant Patil, Vishwajeet Kadam : जयंत पाटील, विश्वजीत कदमांची वाढलीय 'धडधड' : महाविकास आघाडीपुढे कमबॅकच आव्हान!

आता आगामी स्थानिकच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश करून गटाला नवी उर्जा देण्याची संधी जयश्रीताई यांच्याकडे चालून आली आहे. तर तशी कार्यकर्त्यांचीही मागणी आहे. याच दबावाची कुणकुण अजित पवार गटात गेलेल्या दुष्काळी फोरमला लागलीय. त्याप्रमाणे नेत्यांनी आता मानसिंगराव नाईक आणि जयश्रीताई मदन पाटील यांना आपल्याकडे जोडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर हे दोन्ही नेते जिल्हा बँकेच्या चाव्या असल्याप्रमाणेच असल्याने ते आपल्याबरोबर आल्यास जिल्ह्यावर अजित पवार गटाची पकड निर्माण होणार आहेत. यामुळे आता हालचालींना वेग आला असून आता फक्त अजित पवार यांच्या निर्णयाची प्रतिक्षा दुष्काळी फोरमच्या नेत्यांना लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com