
Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष असलेले राजेंद्र हगवणे हे सुनेच्या मृत्यू प्रकरणांमध्ये प्रमुख आरोपी आहेत. या प्रकरणांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेबाबत विरोधी पक्षाकडून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. अशातच करुणा मुंडे यांनी देखील रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली.
करुणा मुंडे यांनी पुण्यामध्ये शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबत बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, वैष्णवी सारखी तरुण मुलगी आत्महत्या करू शकत नाही असे वाटत आहे. पोस्टमार्टममध्ये तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचं निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय वाटत आहे. तिला मारून परत फास दिला असावा, असे वाटत असल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या बऱ्याच घरांमध्ये वैष्णवी हगवणे, करुणा मुंडे आणि पूजा चव्हाण यांच्यासारख्या महिला आहेत. मात्र शासन, प्रशासन आणि महिला आयोग त्यांच्यासाठी काही करत नाही. वैष्णवीची मोठी जाऊ असलेल्या मयुरी हगवणेला देखील मोठ्या प्रमाणात मारहाण झाली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या.
वैष्णवी हगवणे प्रकरणांमध्ये तिच्या नवऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून पुढे अजून एखादी वैष्णवी हगवणे बरोबर असे काही होणार नाही, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली. वैष्णवी हगवणे हिची जाऊ मयुरी हगवणे यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. परंतु त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही. महिला आयोगाकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई झाली नाही, अशा अनेक महिला माझ्याकडे येऊन सांगतात.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) या फक्त आपल्याकडे 35000 महिलांच्या तक्रारी आल्या असल्याचे सांगतात. मात्र, त्यातील किती तक्रारींचा निपटारा केला याबाबत त्या काही सांगत नाही. मी देखील सहा कंप्लेंट करून देखील त्यांनी माझ्या कंप्लेंटवर कोणतीही कारवाई केली नसल्याच्या त्या म्हणाल्या.
महिला आयोगाच्या अध्यक्षांसाठी फक्त ते एक पद असलं तरी महिलांसाठी ते एक प्रकारे न्याय देणारे कोर्ट आहे. मात्र महिला आयोगाच्या अध्यक्ष भाषणबाजीमध्ये आणि राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये व्यस्त आणि मस्त असतात अशी टीका करुणा मुंडे यांनी महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.