Maharashtra Politic's : राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज दुपारी पुन्हा एकदा शपथ घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांना शरद पवारांचा तुम्हाला पाठिंबा आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार यांनी आम्हाला पक्षातील सर्वांचाच आशीर्वाद आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या दुसऱ्या बंडाला शरद पवारांचा पाठिंबा आहे का, अशी चर्चा रंगली आहे. (Sharad Pawar support you?: Ajit Pawar said, we are blessed by all in the party...)
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार, छगन भुजबळ यांनी त्यांची बाजू मांडली. ती मांडताना त्यांनी पक्षावरच दावा केला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला आहे. त्यामुळे यापुढे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई पहायला मिळू शकते.
अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यापुढच्या सर्व निवडणुका ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळ्याच्या चिन्हावर लढवणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. तसेच, काही आमदार आणि नेते हे परदेशात आहेत, ते परतल्यानंतर तेही आमच्यासोबत येणार आहेत. तसेच पक्षातील सर्वांचा आम्हाला आशीर्वाद आहे, असेही त्यांनी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.