NCP MLA With Sharad Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे ‘हे’ आमदार पुढे येत म्हणाले ‘मी शरद पवारांसोबतच...’

अजितदादा पवारांना मी नेहमीच या भूमिकेपासून परावृत्त करत होतो.
Sunil Bhusara-Sharad Pawar
Sunil Bhusara-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtara Politic's : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुन्हा बंड करत शिवसेना-भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून अजित पवार यांच्यासोबत आठ आमदारांनीही मंत्रीपदाचीही शपथ घेतली आहे. त्यानंतर विक्रमगडचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपण शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (I am with Sharad Pawar : MLA Sunil Bhusara)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दुपारी उमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आमदार भुसार यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

Sunil Bhusara-Sharad Pawar
Sharad Pawar Reaction : अजितदादांच्या बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; ‘पंतप्रधानांनी दोन दिवसांपूर्वी जो आरोप केला होता...’

आमदार भुसारा म्हणाले की, आज सत्तासंघर्षामध्ये काही शपथविधी झाले आहेत. माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी आज जरा उशिरा उठलो. त्यानंतर टीव्हीसमोर गेल्यानंतर सगळा घटनाक्रम बघायला मिळाला. अजितदादा पवारांना मी नेहमीच या भूमिकेपासून परावृत्त करत होतो. मागच्या काळात ज्या ज्या लोकांनी अजितदादांना हे करायला प्रवृत्त केलं, त्यांच्याविषयींच्या त्यांच्या संकल्पना काय आहेत, हे वेळोवळी मांडण्याचा प्रयत्न केला.

Sunil Bhusara-Sharad Pawar
AjitDada on Sharad Pawar : शरद पवारांचा तुम्हाला पाठिंबा आहे का?; अजित पवार म्हणाले, 'पक्षातील सर्वांचा आम्हाला आशीर्वाद…'

राष्ट्रवादी काँग्रेसचा सैनिक म्हणून मी पक्षासोबत कायम आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी संघटनेसोबतच राहणार आहे. माझ्या पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनीसुद्धा मनात किंतु परंतु न आणता पवारसाहेबांच्या पाठीशी तन मन धनाने उभे राहावे, असे आवाहन मी यानिमित्ताने करतो, असेही आमदार सुनील भुसारा यांनी स्पष्ट केले.

Sunil Bhusara-Sharad Pawar
Raj Thackeray Reaction : अजितदादांच्या शपथविधीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; शरद पवारांना उद्धव ठाकरेंचं ओझं उतरवायचं होतं

शरद पवार काय म्हणाले?

देशाच्या पंतप्रधानांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित विधान केलं होतं. त्यात दोन गोष्टींचा उल्लेख केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. ते सांगताना राज्य सहकारी बॅंक आणि सिंचन संदर्भातील जी तक्रार होती, त्याचा उल्लेख केला होता. त्यात राष्ट्रवादी पक्ष सहभागी आहे, असाही आरोप केला होता. मला आनंद आहे की आज राष्ट्रवादीच्या काही सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले सर्व आरोप हे वास्तव नव्हते. सर्व आरोपांतून पक्षाला आणि ज्यांच्याबाबत आरोप केले होते, त्या सगळ्यांना त्यांनी मुक्त केले, त्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बंडानंतर दिली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com