Satara Politic's : अजितदादांच्या बड्या नेत्याचा भाजप आमदाराच्या मतदारसंघात पाहुणचार; स्थानिक नेता गळाला लागल्याचे संकेत

Ajit Pawar's NCP Politic's : कराड दक्षिणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आपल्या गोटात खेचण्याची मोहीम सुरू केली आहे. नानासाहेब पाटील यांनी खासदार नितीन पाटील यांची भेट घेतली.
Nitin Patil
Nitin PatilSarkarnama
Published on
Updated on
  1. कराड दक्षिण मतदारसंघात स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी आणि पक्षप्रवेश मोहिमेला वेग दिला आहे.

  2. काँग्रेसचे स्थानिक नेते पहिलवान नानासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेत असून भाजपचे नरेंद्र नांगरे पाटीलही चर्चेत आहेत.

  3. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांत कार्यकर्त्यांच्या हालचालींमुळे कराड दक्षिणमधील राजकीय समीकरणे बदलत आहेत.

Karad, 23 October : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून सध्या भाजपचे वर्चस्व असलेल्या कराड दक्षिण मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही काँग्रेसच्या प्रवाहात असणारे स्थानिक पुढारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्याचा सपाटाच लावला आहे.

कराड दक्षिणमधील काँग्रेसचे स्थानिक नेते पहिलवान नानासाहेब पाटील यांनी आज (गुरुवारी, ता. २३ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील (Nitin Patil) यांचे स्वागत करून बराच वेळ त्यांच्यासोबत चर्चा केली. पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी पक्ष प्रवेशासंदर्भात पहिलवान पाटील यांच्याबरोबर चर्चा केल्याचे समजते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर, स्वबळावर होणार की महायुती आणि महाविकास आघाडीद्वारे लढवल्या जाणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र, महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) नेत्यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्या तीनही पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेशाचाही धडाका लावला आहे. त्याचबरोबर पक्षीय पातळीवर चाचपणीही सुरु केली आहे.

नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीची आऱक्षण सोडत झाली आहे. त्यामुळे तीनही पक्षांकडे आरक्षणानुसार निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या इच्छुकांवर शिक्कामोर्तब अद्यापही झाले नसली तरी इच्छुकांनीही आता पायाला भिंगरी लावून फिरण्याचा श्रीगणेशा केला आहे.

सातारा जिल्हा परिषद, ११ पंचायत समिती, नऊ नगरपालिकांसाठी सातारा जिल्ह्यातील सर्वच पक्षांची तयारी सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने कऱ्हाड तालुक्यातील राजकीय समिकरणे बदलत असल्याचे दिसत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे.

Nitin Patil
Kolhapur Politic's : एक गट फुटताच समीकरणे बदलली; दोन मतदारसंघाच्या वेशीवरील निगवे खालसा गटाचे मैदान नरके, राहुल पाटलांसाठी सोपे झाले?

कऱ्हाड दक्षिणमध्ये ॲड. उंडाळकर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आल्याने तालुक्यात पहिल्यांदाच त्या पक्षाला त्यांच्या गटाची ताकद मिळाली आहे. यावेळच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कऱ्हाड दक्षिणमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक असतील त्यांचा प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.

कराड दक्षिण मतदार संघात उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसच्या प्रवाहात असणारे स्थानिक पुढारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. कराड दक्षिणमधील काँग्रेसचे स्थानिक नेते पहिलवान नानासाहेब पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पाटील यांचे स्वागत करून बराच वेळ त्यांच्यासोबत चर्चा केली. पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी पक्ष प्रवेशासंदर्भात पाटील यांच्याबरोबर चर्चा केल्याचे समजते.

भाजपच्या नरेंद्र नांगरे पाटलांचीही हजेरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण मतदार संघात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. मध्यंतरी काँग्रेसचे नरेंद्र नांगरे पाटील यांनी भाजपमध्ये आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. त्यानंतर आज खासदार नितीन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांच्या उपस्थितीत पहिलवान नानासाहेब पाटील यांच्या झालेल्या बैठकीदरम्यान नरेंद्र नांगरे पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे तेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार की काय, याबाबत उलट उलट चर्चा सध्या सुरू आहे.

Nitin Patil
Mohite Patil : अडचणीतील पुतण्याच्या मदतीला पुन्हा धावले काका; जयसिंह मोहिते पाटलांच्या नव्या भूमिकेमुळे खळबळ!

Q1. कराड दक्षिण मतदारसंघात कोणत्या पक्षांची प्रमुख चुरस आहे?
A1. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रमुख चुरस आहे.

Q2. पहिलवान नानासाहेब पाटील कोणत्या पक्षात जाण्याची शक्यता आहे?
A2. ते काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Q3. नरेंद्र नांगरे पाटील कोणत्या पक्षात आहेत आणि सध्या काय चर्चा आहे?
A3. सध्या ते भाजपमध्ये आहेत, पण त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार का यावर चर्चा सुरू आहे.

Q4. स्थानिक स्वराज्य निवडणुकीची तयारी कोणत्या स्तरावर सुरू आहे?
A4. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका पातळीवर सर्व पक्षांनी उमेदवार चाचपणी सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com