Kolhapur Flood
Kolhapur Flood Sarkarnama

Akiwat Shirol Tractor Accident : अकिवाटच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू; पालकमंत्री हसन मुश्रीफ अन् खासदार धैर्यशील माने घटनास्थळी

Kolhapur Flood : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात अकिवाटच्या दुर्घटनेत सरपंच पतीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरगदारचा महापुराच्या पाण्यात शोध सुरु आहे.
Published on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अकिवाट येथे महापूराच्या पाण्यात ट्रॅक्टर घातल्याने तो पलटी झाल्यानंतर सात जण वाहून गेल्याची घटना सकाळी घडली होती. त्यातील 5 जणांना वाचवण्यात यश आल्यानंतर दोघांचा शोध सुरू होता. तर एक जण मृत झाल्याची माहिती समोर आली आहे. अकिवाटच्या महिला सरपंच यांचे पती सुहास पाटील यांचा महापूराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

तर जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले इकबाल बैरगदार यांचा एनडीआरएफ पथक आणि कर्नाटकच्या 'एसडीआरएफ' जवानांकडून शोध सुरू आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली होती. पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी या ठिकाणी भेट देऊन दुर्घटनाग्रस्तांना शासनातर्फे मदत दिली जाईल, अशी आश्वासन दिले आहे.

शिरोळ तालुक्यातील आकिवाट येथे आज सकाळी नऊच्या दरम्यान गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने महिला सरपंचाचे पती सुहास पाटील हे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी रस्त्यापलीकडे जात होते. तर अन्य काहीजण केळी आणि आपल्या वैयक्तिक कामासाठी जात असल्याची माहिती आहे. मात्र रस्त्यावर अडीच ते तीन फूट पाणी असल्याने ट्रॅक्टर चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने महापूरात ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टर मधील सातजणांनी प्रवाहात उड्या घेतल्या. त्यातील पाच जणांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले. अन्य दोघांचा शोध कार्य सुरू ठेवले आहे.

Kolhapur Flood
Jaykumar Gore News : आमदार गोरेंच्या विरोधात याचिका करणाऱ्या देशमुखांच्या घरांवर ईडीची धाड; दबावतंत्राचा वापर ?

'एनडीआरएफ'चे पथक आणि कर्नाटकचे 'एसडीआरएफ' पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या दोघांचे शोध कार्य सुरू होते. दुपारी एक नंतर महिला सरपंचाचे पती सुहास पाटील यांचा शोध लागला. तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सदस्य इकबाल बैरगदार यांचा शोध एनडीआरएफ पथकाकडून सुरू आहे.

Kolhapur Flood
Yogesh Tilekar: विधानसभेत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवा; योगेश टिळेकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची अकिवाट येथे दुर्घटनास्थळाला दिली भेट

'एनडीआरएफ'च्या जवानांकडून मदत कार्याची माहिती घेतली. दत्तवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरु आहेत. त्यावेळी मृत सुहास पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी शासकीय मदत करणार असल्याची आश्वासन देण्यात आले आहे. तसेच दुर्घटनाग्रस्तांना तात्काळ चार लाखांची मदत पालकमंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane), जिल्हाधिकारी अमोल येडगे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाटगे, अशोकराव माने, विजय भोजे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com