Solapur BJP : मातब्बर दोन देशमुखांना भाजपमधूनच चॅलेंज; हायकमांडच्या निर्णयाकडे लक्ष

Assembly Election 2024 : सोलापूर भाजपचा कारभार ज्यांनी आतापर्यंत हाकला, ते सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्या उमेदवारीला आता त्यांच्याच मतदारसंघातून पक्षातून चॅलेंज दिले जाऊ लागले आहे.
Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh
Subhash Deshmukh-Vijaykumar DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 01 October : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या तयारीने वेग घेतला असतानाच सोलापूर भाजपमध्ये मात्र विद्यमान आमदारांनाच विरोधाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सोलापूर भाजपचा कारभार ज्यांनी आतापर्यंत हाकला, ते सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्या उमेदवारीला आता त्यांच्याच मतदारसंघातून पक्षातून चॅलेंज दिले जाऊ लागले आहे.

आगामी निवडणुकीत दोन्ही देशमुखांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे भाजप हायकमांड उमेदवारीच्या संदर्भात काय निर्णय घेणार, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सोलापूर शहर उत्तर मतदार संघातून माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांनी आतापर्यंत तब्बल चार वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. ते 2004 पासून आतापर्यंत या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून चार वेळा जिंकलेले देशमुख यांना ठोस विकास कामे करता आली नाहीत, असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, जगदीश पाटील, चन्नवीर चिटे, हेमंत पिंगळे, श्रीशैल बनशेट्टी आदींनी देशमुख यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. यातील माजी महापौर बनशेट्टी यांनी तर थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप हायकमांडने विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी देऊ नये. सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघातून नव्या व्यक्तीला संधी देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी महापौर, माजी सभागृह नेते आणि काही माजी नगरसेवकांनी केली आहे शोभा बनशेट्टी यांच्याबरोबरच चन्नवीर चिट्टे यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत.

Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh
Bhavana Gawali : भावना गवळींनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद ; ‘लोकसभेला सर्व्हेमुळे माझा बळी गेला...’

भारतीय जनता पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात मेळावा घेत त्यांच्या उमेदवारीला आगामी विधानसभा निवडणुकीत विरोध राहील, असे स्पष्ट केले आहे. विशेषतः या बैठकीला महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद थोबडे यांचीही उपस्थिती होती.

माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनाही दक्षिण सोलापूर मतदार संघातून उमेदवारी देण्यासाठी विरोध दर्शविला जात आहे. भाजपचे माजी उपमहापौर यांच्यासह सहा माजी नगरसेवकांनी सुभाष देशमुखांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. विशेषतः माजी उपमहापौरासह हे सहा माजी नगरसेवक हे एकेकाळी देशमुख यांचे समर्थक होते.

सुभाष देशमुख यांच्याऐवजी सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस या माजी उपमहापौरासह माजी सहा नगरसेवकांनी केली आहे त्या माजी नगरसेवकांनी पक्षाकडे याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, देशमुख यांच्या विरोधात याच मतदारसंघामधील भाजपच्याच लोकांमध्ये नाराजीची भावना दिसून येत आहे.

Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh
Praniti Shinde : येत्या दोन महिन्यांत सरकारच्या सर्व योजना बंद होणार; प्रणिती शिंदेंचा दावा

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपमधील कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार की विद्यमान आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनाच पुन्हा संधी देणार, याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com