Pune News : पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून एका युवतीचे अपहरण तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना पिडीत युवतीने पोलिसांना 112 नंबरवर फोन करून माहिती दिल्यानंतर उघडकीस आली आहे. या प्रकरणी 5 जनांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक या प्रकरणात एका महिला कीर्तनकाराचा सहभाग आहे. (Alandi girl abduction and rape case involving five accused including a woman kirtankar)
पिडीत युवती अहिल्यानगर जिल्ह्यातील असून तिचे गेल्या महिन्यात (ता. 2 जून) अपहरण करण्यात आले होते. तर तिला आळंदी येथील केळगाव रोडवर असणाऱ्या मुलींच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत तिला जबरदस्तीने डांबून ठेवले होते. या दरम्यान तिच्यावर सतत बलात्कार करत लग्नासाठी दबाव टाकण्यात येत होता. याबाबत सबंधित पिडीत युवतीने पाच जणांविरुद्ध अहिल्या नगर शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर या घटनेत एका महिला कीर्तनकाराचा सहभाग आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, पिडीत युवती अहिल्यानगर जिल्ह्यातील तिच्या घरी (ता. 2 जून) एकटीच होती. यावेळी तिच्या ओळखीतील किर्तनकार सुनिता आंधळे या घरी आल्या होत्या. यावेळी आंधळे यांनी तिला शेतात जाऊ येऊ असे म्हणत घराबाहेर आणले. तसेच तिला तेथे आधिपासूनच उभ्या असलेल्या एका काळी चारचाकीत (MH 43 CC 7812) तिला ढकलले. यावेळी तिचा प्रतिकार मोडत आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, अभिमन्यु आंधळे आणि किर्तनकार सुनिता आंधळे तिला गाडीत जबरदस्तीने बसवले.
यावेळी पिडीत युवती आरडा-ओरडा करणार तोच तिचे तोंड दाबत तिला आवाज करू नको अन्यथा तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड टाकू अशी धमकी दिली. यामुळे तिला गप्प बसावं लागलं. यानंतर अहिल्यानगर येथून निघालेली गाडी थेट पुण्यातील आळंदी येथील मुलींच्या खासगी वारकरी शिक्षण संस्था असलेल्या इमारतीत येऊन थांबली.
येथे आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, किर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यु आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले. तसेच , आण्णासाहेब आंधळे यांने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तिच्यावर सतत याच पद्धतीने बलात्कार आणि लग्नासाठी दबाव टाकला जात असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. यानंतर स्वत:ला सावरत त्या पिडीतेनं हुशारीने 112 नंबर कॉल करत मदत मागितली. यावेळी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी तपासाची चक्र फिरवत घटनास्थ गाटले. तसेच संबंधित व्यक्तींना अटक करत आळंदी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
सुरुवातीला पीडित युवती घाबरल्यामुळे तक्रार दिली नाही. पण तिने सर्व हकीकत घरच्यांना सांगितल्यानंतर (7 जुलै) या बाबत शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रविण प्रल्हाद आंधळे, गाडीचा अनोळखी चालक, सुनिता अभिमन्यु आंधळे, अभिमन्यु भगवान आंधळे या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आता आळंदी परिसरात खळबळ उडाली असून खासगी मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेतील मुलींच्या सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.