Kolhapur News : महादेवराव महाडिकांसह तीन जणांचा विजय; इतरांची मोठी आघाडी : सतेज पाटलांना धक्का...

Sugar Factory Election Result Kolhapur : या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांनी पहिला विजय मिळवला आहे
mahadevrao mahadik
mahadevrao mahadikSarkarnama

Rajaram Sugar Factory Election Result : कोल्हापुरातील (Kolhapur) अटितटीच्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना ( Chhtrapati Rajaram Sugar Factory Election Result) निवडणुकीची मतमोजणी कोल्हापूरमधील रमणमळा शासकीय गोदामात सुरु आहे. यामध्ये निवडणुकीचे कल आता स्पष्ट होत आहेत.

या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांनी पहिला विजय मिळवला आहे. त्यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजायनंतर महाडिक गाटाच्या वतीने कोल्हापूरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाडिक गटाचे सर्व 21 उमेदवार आघाडीवर आहेत. उमेदवार सरासरी अडीच हजार मतांनी आघाडीवर आहेत.

mahadevrao mahadik
kolhapur News : विजयाचा गुलाल उधळताच महादेवराव महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा; राजकारणाला वेगळी दिशा मिळणार...

माजी आमदार महादेवराव महाडिक (mahadevrao mahadik) यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर विरोधी गटाचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांना इशारा दिला. महादेवराव महाडिक यांनी विजयाचे श्रेय सभासदांबरोबरच माजी आमदार अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांना दिले आहे. या विजयामुळे कोल्हापूरच्या (kolhapur) राजकारणाला वेगळी दिशा मिळाल्याचे महाडिक यांनी सांगितले.

राजाराम साखर कारखाना निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचा 39 मतांनी विजय झाला आहे. त्यांच्या गटातील उमेदवारांनी विजयाकडे घोडदोड सुरु केली आहे. माध्यमांशी बोलताना महादेवराव महाडिक म्हणाले, आजचा विजय हा आवाडे, सावकार, विनय कोरे यांच्यासह सर्व महाडिक गटाचा विजय आहे.

mahadevrao mahadik
Amal Mahadik Leading: अटीतटीच्या लढतीत माजी आमदार अमल महाडिकांची मोठी आघाडी

महाडिक म्हणाले, महाडिकांकडे असलेली ताकद ही गोरगरीब जनतेची आहे. धनंजय महाडिक, अमल महाडिक यांना पहिले सलामी द्या, मग बाकीचे पुढे पुढे पाहू. ज्याला शड्डू मारायला येत नाही, त्याला शड्डू मारायला शिकवत आहे. मी शेलार मामा आहे, मी फूकून उडवून टाकेन, असा थेट इशारा त्यांनी सतेज पाटील गटाला दिला.

महादेवराव महाडिक यांना 83 मते मिळाली आहेत. विरोधी उमेदवार सचिन पाटील यांना 44 मते मिळाली आहेत. राजाराम कारखाना निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी तगडे आव्हान निर्माण केले होते. कारखानाच्या नऊपैकी सहा गटातून महाडिक गटाने बाजी मारली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com