Solapur Bazar Samiti : मुख्यमंत्री शिंदेंची अजितदादा, फडणवीसांना धोबीपछाड; सोलापूर बाजार समितीवर समर्थकांची वर्णी

Eknath Shinde Group News : राज्याच्या अव्वर सचिव माधवी शिंदे यांनी याबाबतचा आदेश काढला असून तो पणन संचालकांच्या त्यावर शिक्कामोर्तब करतील, त्यानंतर शिंदे आणि काळजे हे दोघे बाजार समितीच्या कामकाजाचा पदभार घेतील.
Solapur Bazar Samiti-Eknath Shinde-Manish Kalje-Amol Shinde
Solapur Bazar Samiti-Eknath Shinde-Manish Kalje-Amol ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 July : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड देत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपल्या दोन समर्थकांची वर्णी लावत बाजी मारली आहे. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या चिरंजीवासह तिघांची अशासकीय प्रशासक नेमणुकीसाठी केलेल्या शिफारशीचा आदेश निघण्यापूर्वीच एकनाथ शिंदे हे आपल्या दोन युवा नेत्यांच्या नावाचा आदेश काढण्यात यशस्वी ठरले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अमोल शिंदे (Amol Shinde) आणि मनीष काळजे (Manish Kalje) यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Solapur Bazar Samiti) अशासकीय प्रशासक म्हणून वर्णी लावली आहे. राज्याच्या अव्वर सचिव माधवी शिंदे यांनी याबाबतचा आदेश काढला असून तो पणन संचालकांच्या त्यावर शिक्कामोर्तब करतील, त्यानंतर शिंदे आणि काळजे हे दोघे बाजार समितीच्या कामकाजाचा पदभार घेतील.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास दोन वेळा मुदतवाढ मिळाली होती. दुसरी मुदतवाढ 14 जुलै रोजी संपल्यानंतर बाजार समितीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र सोलापूर बाजार समितीला तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली नव्हती. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

Amol Shinde
Amol ShindeSarkarnama

सभापती विजयकुमार देशमुख यांच्याकडून त्यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख, विक्रम देशमुख आणि शिवानंद पाटील या तिघांची बाजार समितीवर अशासकीय प्रशासक म्हणून निवड करावी, यासाठी पणन संचालकांकडे शिफारस करण्यात आली होती. मात्र, पणन संचालकांकडून या शिफारशीला मंजुरी देण्याऐवजी पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आली होती.

Manish Kalje
Manish KaljeSarkarnama

भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलेल्या तिघांच्या शिफारशींवर निर्णय झालेला नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मात्र तातडीने आपल्या गटातील दोन तरुण नेत्यांची बाजार समितीवर प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश अवर सचिवांच्य सहीने काढण्यात आला आहे, त्यामुळे भाजपच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांची बाजार समितीवर वर्णी लावत भाजी मारली आहे.

भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून बाजार समितीवर आपल्या समर्थकांना नेमण्यासाठी हालचाली सुरू असताना अजित पवार गटात मात्र शांतता होती. मात्र, भाजपच्या तिघांची नावे जाहीर होताच अजित पवार गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अजित पवार गटातील दोघांची बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळात वर्णी लागू शकते.

Solapur Bazar Samiti-Eknath Shinde-Manish Kalje-Amol Shinde
Karmala Assembly Candidate : पवारांच्या राष्ट्रवादीचा करमाळा विधानसभेचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांनी केली घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com