Maharashtra Political Appointments : एसटी महामंडळ अध्यक्षपदाच्या टायमिंगवर भरत गोगवले नाराज; म्हणाले, ‘हे पद लवकर मिळाले असते तर...’

Bharat Gogavle unhappy with CM Ekanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची गेली अडीच वर्षांत तारेवरची कसरत झाली आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्षपद मिळूनही भरत गोगावले अद्याप नाराजच आहे.
Bharat Gogawale
Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 20 September : शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद, महाडचे आमदार भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देऊ केले आहे. मात्र, आमदार गोगावले यांनी अजून ते स्वीकारलेले नाही. आम्ही कुठलेही पद मागितलेले नाही. ते मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. पण हे पद लवकर दिले असते, तर काम करायला वेळ मिळाला असता, अशा शब्दांत आमदार भरत गोगावले यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या टायमिंगवर नाराजी व्यक्त केली आहे.

आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले, मला एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. मात्र, मी अजूनही ते पद स्वीकारले नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करूनच मी निर्णय घेणार आहे. आम्ही कुठलेली पद मागितलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक काही पदे आम्हाला दिली आहेत. मात्र, हे पद लवकर दिले असते, तर काम करायला वेळ मिळाला असता, अशी नाराजीही त्यांनी न बोलता व्यक्त केली.

मला मंत्रिपद (Minister Post) हवे होते. पण, तीन पक्षांच्या आघाडीमुळे ते मिळू शकलेले नाही. त्यावरून मी नाराज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः आम्हाला पदे दिली आहेत. त्यांच्याशी बोलूनच पद घ्यायचे की नाही, ते मी ठरवणार आहे, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.

येत्या काही दिवसांत निवडणुका आहेत. आम्हाला निवडणुकांचीही कामे करायची आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच आम्ही निर्णय घेणार आहोत, असे भरत गोगावले यांनी नमूद केले.

Bharat Gogawale
Bharat Gogawale : भरत गोगावले मंत्रिपदाबाबत प्रचंड आशावादी...आता म्हणतात पुढच्या मंत्रिमंडळात 100 टक्के असेन!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची गेली अडीच वर्षांत तारेवरची कसरत झाली आहे, असे सांगून गोगावले म्हणाले, मला चौथ्यांदा निवडून यायचे आहे. लोकांशी माझा चांगला संवाद आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कायम उपलब्ध असतो आणि जनताही अशाच लोकांना निवडून देत असते.

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू आहे. पण त्यामुळे काही होणार नाही, कारण ते निवडूनच येणार नाहीत. या दोघांना भांडू द्या. दोघांत तिसऱ्याच फायदा यानुसार त्यांच्यातील वादाचा आम्हाला निश्चितपणे फायदा होईल, असा दावाही भरत गोगावले यांनी केला.

Bharat Gogawale
Solapur BJP : उमेदवारीसाठी शिफारस करणे अंगलट; भाजपच्या सोलापूर शहर उपाध्यक्षांसह चौघांना नोटीस

महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहेत. बैठका सुरू आहेत. जवळपास १०० जागा आम्ही मागू. या जागा आम्ही स्ट्राईक रेटनुसार मागणार नाही. पण, आम्ही जागांबाबत चर्चा करत आहोत, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com