
Sangli News : तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर तासगाव-कवठेमहांकाळमध्ये संतापराची लाट उसळली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर या प्रकरणात आता तासगाव पोलिसांनी वडगाव येथील एका विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात देखील घेतलं आहे. विजय जालिंदर पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. (tasgaon kavathe mahankal mla rohit patil obscene facebook post fir filed ncp sp protest)
तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांच्याबद्दल विजय पाटील याने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या प्रकरणानंतर तासगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. मात्र समज देऊन सोडून दिले. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
यानंतर पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर रात्री उशिरा हातनूर येथील सचिन काशिनाथ पाटील यांनी विजय पाटील याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान सांगली जिल्ह्यासह राज्यातील द्राक्ष शेतीवरून रोहित पाटील यांनी विधीमंडळात आवाज उठवला. त्यांनी मे पासून सुरू असलेल्या पावसाचा जबर फटका बसला द्राक्ष उत्पादकांना बसल्याचे सरकारला लक्षात आणून दिले. तसेच कृषी विभागाकडून कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही, अशी नाराजी व्यक्त केली.
यावरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या उत्तरावर आमदार पाटील यांनी आक्षेप घेतला. लक्षवेधीतील प्रश्नावर कृषीमंत्री चुकीचे उत्तर देत असल्याचे म्हणत आमदार पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला. कृषी मंत्र्यांच्या उत्तरावर आक्षेपही घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.