Gokul Politics: धक्कादायक! गोकुळच्या राजकारणासाठी वाटेल ते... हरकतींची मुदत संपली तरी धुसफूस सुरुच, माजी अध्यक्षाच्या शिरोलीत ८४ तर घोटवडेत ३२ ठराव

Gokul Politics: गोकुळ दूध संघाच्या प्रारूप मतदार यादीवर जवळपास १,७४७ हरकती आल्यानंतर मागील पाच दिवसात या संस्थांवरील हरकतीच्या सुनावणी पूर्ण झाल्या.
Gokul Politics
Gokul PoliticsGokul Politics
Published on
Updated on

Kolhapur Gokul Politics: गोकुळ दूध संघाच्या प्रारूप मतदार यादीवर जवळपास १,७४७ हरकती आल्यानंतर मागील पाच दिवसात या संस्थांवरील हरकतीच्या सुनावणी पूर्ण झाल्या. मात्र, या सुनावणीनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोकुळमधील दोन ज्येष्ठ आणि माजी अध्यक्षांच्या गावातच अनेक व्यक्तींच्या नावावर ठराव दाखल झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघासाठी वाटेल ते करण्याची तयारी काही ज्येष्ठ नेत्यांनी ठेवली आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

करवीर तालुक्यातील शिरोली दुमालात (दुहेरी हक्क) ८४ तर राधानगरी तालुक्यातील घोटवडे गावात सर्वाधिक ३२ ठरावधारक आहेत. शिरोलीत ७२ तर घोटवडेतील २७ जणांच्या नावे तालुक्यतील अन्य गावामधील दूध संस्थांचे ठराव केले आहेत. त्यामुळे त्याचे राजकीय पडसाद अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमटण्याची शक्यता आहे.

Gokul Politics
15 लाखापर्यंतचे बँक कर्ज, 4.5 लाखापर्यंतचा व्याजाचा परतावा; महिलांसाठी खास 'आई' कर्ज योजना...

गोकुळ दूध संघाच्या प्रारूप मतदारयादीत कार्यक्षेत्राबाहेरील ठराव धारकांवर अधिक हरकती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रारूप मतदारयादीत सर्वाधिक असे ठरावधारक हे गोकुळचे माजी अध्यक्ष असलेल्या नेत्यांच्या दोन गावातील आहेत. तर कागल शहरातही १४ ठराव अशा पध्दतीचे असल्याचे समजते.

करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला गावात दूध संस्था १२ आहेत. मात्र प्रारूप मतदार यादीत ठरावधारकांची संख्या ८४ इतकी आहे. तर घोटवडे गावात दूध संस्था पाच असून ठरावधारक ३२ आहेत, त्यामुळे या दोन्ही गावातील ठरावांची संख्या तालुक्यात चर्चेत आली आहे. प्रारूप यादीवरील हरकती सुनावणीमध्ये दूध संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरील कार्यक्षेत्राबाहेरील ३९४ आणि गोकुळ कर्मचान्यांच्या नावे असलेल्या सुमारे १८४ ठरावांवर हरकती घेण्यात आल्या. सुनावणीमध्ये या हरकतीचा मुद्दाच सर्वाधिक गाजला. कार्यक्षेत्राबाहेरील ३९४ ठरावांपैकी सुमारे ११६ ठराव हे शिरोली दुमाला आणि घोटवडे गावातील आहेत.

Gokul Politics
Rahul Gandhi : काँग्रेस अध्यक्षांच्या भाषणानंतर शुद्धीकरण, राहुल गांधींचा भाजपवर 'सर्जिकल स्ट्राइक'; PM मोदींकडे एफआयआरची मागणी!

त्यामुळे 4 सप्टेंबर रोजी अंतिम यादीत या ठरावधारकांना स्थान मिळणार का? हे पाहावे लागणार आहे. शिवाय ३१ ऑगस्ट रोजी या सर्व प्रारूप हरकतीवरील सुनावणी चा निकाल होणार आहे त्यानंतरच राजकीय वादंग उठण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com