Rajan Patil News : अजित पवार सत्तेत जाताच माजी आमदार राजन पाटलांचं स्वप्नपूर्तीकडे एक पाऊल

Mohol Political News : शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती घडविणाऱ्या "अनगर आणि दहा गावे उपसा सिंचन योजने"ला अखेर मंजुरी
Rajan Patil -Yashwant Mane
Rajan Patil -Yashwant ManeSarkarnama

राजकुमार शहा -

Mohol : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात अजित पवारांनी बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना निधी देतानाच त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांना गतीही दिली. माजी आमदार राजन पाटील हे या प्रश्नाचा गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करत होते. अखेर अजितदादांनी सत्तेत जाताच राजन पाटलांच्या योजनेला मंजुरी मिळाल्याने एक पाऊल स्वप्नपूर्तीकडे पडले आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती घडविणाऱ्या "अनगर आणि दहा गावे उपसा सिंचन योजने"ला अखेर मंजुरी मिळाली असून, ही मंजुरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या प्रयत्नानेच मिळाल्याची माहिती या योजनेचे जनक तथा माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने(Yashwant Mane) यांनी दिली. दरम्यान, येत्या दिवाळीपूर्वी या योजनेच्या सर्वेचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याचे आमदार माने यांनी सांगितले.

Rajan Patil -Yashwant Mane
Rajan Patil News : राष्ट्रवादीच्या राजन पाटलांच्या भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा; माढ्याच्या खासदारासोबत अनगरमध्ये गुफ्तगू

अनगरसह परिसरातील देवडी, वाफळे, खंडोबाची वाडी, चिखली,नालबंदवाडी कोंबडवाडी, कुरणवाडी, वडाचीवाडी ही गावे कायम दुष्काळी छायेत आहेत. या गावांना पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याची भ्रांत असते. ही अडचण ओळखून माजी आमदार राजन पाटील यांनी वरील योजनेच्या गावांचा सिंचन योजनेचा आराखडा तयार केला. या योजनेसाठी 0.58 दशलक्ष घनफूट पाणी लागणार आहे.

ही योजना आष्टी उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणात सामाविष्ट असल्याने या योजनेसाठी वेगळे पाणी उपलब्ध करण्याची गरज नाही. तसेच आष्टी उपसा सिंचन योजनेतील पाणीही वापरण्यात येणार नाही. या योजनेसाठी 200 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे.

या सिंचन योजनेचा मुख्य उद्भव आष्टी तलाव असून, तेथून बंदिस्त जलवाहिन्या टाकून पाणी उचलण्याची ही योजना आहे. या योजनेचा पाणी वितरण चेंबर खंडाळीच्या माळरानावर काढण्यात येणार असून, तिथून पाण्याचे वितरण होणार आहे. (Rajan Patil)

येत्या महिन्याभरात या योजनेच्या सर्वेचा आदेश प्रस्तावित असून, त्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या सर्वेचा कालावधी सुमारे तीन महिन्याचा आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यावर या परिसरातील ऊस शेतीसह द्राक्ष, डाळिंब, पेरू, केळी, सिताफळ या फळबागांचे क्षेत्र वाढीस लागणार आहे.

Rajan Patil -Yashwant Mane
Sunil Shelke News : पवना बंद जलवाहिनी प्रकरण : कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे भेगडे अन् राष्ट्रवादीचे शेळके आले एकत्र

तसेच या योजनेच्या पाण्याने पाझर तलाव, बंधारे भरून घेण्यात येणार असून, विहिरी व बोअरच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. तसेच वाया जाणारे पाणीही वापरात येणार आहे. योजनेला मंजुरी मिळाल्याचे समजतात या योजनेत सामाविष्ट असणाऱ्या गावातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com