Jitendra Sawant
Jitendra Sawantsarkarnama

Satara News : माजी जिल्हा परिषद सदस्यावर प्राणघातक हल्ला; पुण्यात उपचार सुरू

Jintendra Sawant श्री. सावंत हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक असून सातारा तालुक्यातील लिंबचे नेते आहेत.
Published on

लिंब : लिंब (ता.सातारा) येथील सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक जितेंद्र सर्जेराव सावंत यांच्यावर रविवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात श्री. सावंत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. सावंत यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ लिंब परिसरात बंद ठेवण्यात आला आहे.

जितेंद्र सर्जेराव सावंत यांच्यावर रविवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांच्यावर काही युवकांनी कोयत्याने हल्ला केला. सावंत यांच्यावर मानेवर, चेहऱ्यावर वार झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

परंतू, त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले आहे. दरम्यान जितेंद्र सावंत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे लिंब परिसरात बंद ठेवण्यात आला आहे, तर रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

Jitendra Sawant
Satara : भाजप युवा मोर्चाने केला अजित पवारांच्या पुतळ्याचा कडेलोट...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com