Jayshri Jadhav : उमेदवारी मी मागितली, पण मला दुसऱ्याचा अर्ज भरायला बोलवलं

Big reaction of Kolhapur Congress MLA Jayshri Jadhav on ShivSena party entry : कोल्हापूरमधील काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केल्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Jayshri Jadhav
Jayshri JadhavSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला धोका देत आमदार जयश्री जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसकडून नेते सतेज पाटील यांनी बोलताना जाधव कुटुंब प्रतिष्ठित आहे. त्यांना हे अशोभनीय असून त्यांचा पक्षप्रवेश म्हणजे दुर्दैवी आहे, अशी टीका केली होती.

मात्र याला आमदार जाधव यांनी आपण शिवसेनेत प्रवेश का केला याचं नेमकं उत्तर दिलं आहे. इतकच नव्हे, तर उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली.

मी काँग्रेसकडून (Congress) विद्यमान आमदार होते. मला पुन्हा उभं राहण्याची संधी होती. मला दोन वर्षाचा कालावधी मिळाला. पुढे मला आणखी काम करायचं होतं. मी उमेदवारीची मागणी केल्यानंतर त्यांनी मला थांबायला पाहिजे, असं सांगितलं. कोणताही उमेदवार उभा केला, तरी त्यांच्या पाठीशी राहायचं, असं वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं. राजू लाटकर यांना उमेदवारी मिळाल्याने सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही त्याला पाठिंबा दिला. मात्र दुसऱ्या दिवशी असं काय घडलं माहीत नाही. केवळ दुसऱ्याचा उमेदवारी अर्ज भरायला बोलवण्यात आलं, अशी खंत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केली.

Jayshri Jadhav
Jayshri Jadhav : नाराज असूनही जयश्री जाधवांनी अर्ज भरणं टाळलं, पण का?

"माझं शिवधनुष्य सतेज पाटील यांनी उचलला होते. माझ्यामागे माझ्या घराण्याने साथ दिली. मात्र मला माझं काम थांबवायचं नव्हतं, म्हणून मी शिवसेनेत (Shivsena) जाण्याचा निर्णय घेतला. मी आता महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. महायुतीप्रमाणेच मला राहावं लागेल", असेही जयश्री जाधव म्हणाले आहेत.

Jayshri Jadhav
Jayashri Jadhav : कोल्हापुरात राजकीय धमाका; काँग्रेसच्या विद्यमान आमदार शिवसेनेत

आमदार जाधव यांची भूमिका

2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्योगपती चंद्रकांत जाधव यांना काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तरच्या मैदानात उतरवले होते. तत्पूर्वी जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. 2019 च्या निवडणुकीत चंद्रकांत जाधव विजयी झाले होते. 2022 मध्ये चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या जोरावर जयश्री जाधव यांचा विजय झाला होता.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा जयश्री जाधव यांना होती. उमेदवारी मिळण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आपली उमेदवारी निश्चित आहे, असा दावा जयश्री जाधव यांच्याकडून केला जात होता. मात्र जाधव यांना डावलल्यात आले. काँग्रेसकडून अपमान झाल्याची भावना जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com