Jayshri Jadhav : नाराज असूनही जयश्री जाधवांनी अर्ज भरणं टाळलं, पण का?

Kolhapur North Constituency News : विद्यमान आमदार असूनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. पहिल्यांदाच विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहिले आहेत.
Jayshri Jadhav
Jayshri JadhavSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Election: विद्यमान आमदार असूनही कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असताना उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात आमदार जयश्रीताई जाधव यांनी कोणताच निर्णय घेतला नाही.

गेल्या महिनाभरांपासून ते आपल्या उमेदवारीचा दावा करत होते. मात्र त्यांनी अर्ज दाखल न करण्याचाच निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान जयश्री जाधव या नाराज असून पक्ष सोडण्यासंदर्भात त्यांच्या उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

विद्यमान आमदार असूनही पक्षाने उमेदवारी न दिल्याने कोल्हापूर उत्तरच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी आज अर्जच दाखल केला नाही. गेल्या दीड महिन्यांपासून त्या उमेदवारीचा दावा करत होत्या. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात लढणारच असा पवित्रा त्यांनी घेतला होता. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये उमेदवारी बदलाच्या हालचाली सुरू झाल्या.

Jayshri Jadhav
Mahayuti News : जंगल नया है, शेर वही है ; फडणवीसांचे 16 शिलेदार अजितदादा-शिंदेंकडून मैदानात

त्यानंतरही आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांना होती. मात्र मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्या नाराज झाल्या आहेत. दरम्यान विद्यमान आमदार असूनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. पहिल्यांदाच विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहिले आहेत.

Jayshri Jadhav
Ravi Raja : मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. राजकीय वारसदार म्हणून त्यांनी त्यांचे पुत्र राहुल आवाडे (Rahul Awade) यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून ते निवडणूक रिंगणात आहेत.

प्रकाश आवाडे यांनी ‘डमी’ म्हणून अर्ज दाखल केला असला, तरी ते चार नोव्हेंबरपूर्वी आपला अर्ज मागे घेणार आहेत. जागा भाजपला असूनही दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि गेल्यावेळी रिंगणात असलेले माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनीही यावेळी विश्रांती घेतली. त्यांच्याऐवजी राहुल आवाडे यांना पक्षाने उमेदवारी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com