Voting in Solapur : सोलापूर जिल्ह्यात दुपारी एकपर्यंत 29. 44 टक्के मतदान; मतदान केंद्रांवर महिलांच्या रांगा

Solapur Assembly Election 2024 : ग्रामीण भागात मतदानासाठी महिलांचा रांगा लागलेल्या दिसत आहे. या उलट शहरी भागात मतदानाची आकडेवारी हळूहळू पुढे सरकत आहे.
Assembly Election Voting
Assembly Election VotingSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 November : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदासंघात दुपारी एकपर्यंत 29. 44 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात आतापर्यंत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 33.18 टक्के मतदान झाले, तर सर्वांत कमी 24. 26 टक्के मतदान पंढरपूर मतदारसंघात झाले. ग्रामीण भागात मतदानासाठी महिलांचा रांगा लागलेल्या दिसत आहे. या उलट शहरी भागात मतदानाची आकडेवारी हळूहळू पुढे सरकत आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील ११ मतदारसंघात १८४ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. आज सकाळ सातपासून निवडणूक सुरुवात झाली आहे. सकळापासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. विशेषतः महिलांच्या रांगा दिसून येत आहेत. ग्रामीण भागात सकाळच्या सत्रात बऱ्यापैकी मतदान झाले आहे. शहरी भागात मात्र थंडीमुळे थोडे उशिरा मतदार केंद्रावर येताना दिसत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात एकूण ३ हजार ७३८ मतदान केंद्रांवर सकाळी सातपासून मतदान (Voting) होत आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने तगडा बंदोस्त ठेवला असून संपूर्ण जिल्ह्यात तब्बल ११ हजार पोलिस बंदोबस्तावर सध्या कार्यरत आहेत. एकंदरीतच ग्रामीण भागात सकाळपासून, तर शहरी भागात दुपारपासून मतदानासाठी रांगा दिसून येत आहेत.

Assembly Election Voting
Sushilkumar Shinde : ‘सोलापूर दक्षिण’मध्ये काँग्रेसने डाव टाकला; ठाकरेंना धक्का देत शिंदेंकडून अपक्ष काडादींना पाठिंबा जाहीर

सोलापूर जिल्ह्यात दुपारी एकपर्यंत मतदारसंघनिहाय झालेले मतदान

अक्कलकोट....... ३३.१८ टक्के

सोलापूर दक्षिण..... २९. ५३ टक्के

सोलापूर शहर मध्य....२८. ६१ टक्के

सोलापूर शहर उत्तर.... २९.५०टक्के

मोहोळ................ ३०.५१टक्के

माढा..... २६. ३१ टक्के

Assembly Election Voting
Solapur Shiv sena : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; सोलापुरातील दोन नेत्यांची शिवसेनेतून तडकाफडकी हकालपट्टी

करमाळा....... २७.३४ टक्के

पंढरपूर....... २४.२६ टक्के

बार्शी.......... ३२.७१ टक्के

माळशिरस.... ३०.५० टक्के

सांगोला....३१.५८ टक्के

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com