
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या गोकुळ दूध संघासह इतर दूध संघाचा राजकीय फायदा याच्या आधी अनेकांना घेतला आहे. आणि आताही घेतायत. राजकीय फायदा घेण्यासाठी अनेकांनी केवळ ठरावासाठी दूध संस्था काढल्याचे समोर आले आहे. अशा दूध संस्थावर आता सहाय्यक निबंध (दुग्ध) प्रदीप मालगावे यांनी कारवाईचा बडगा उगारत सत्ताधारी आणि विरोधकांनाही दणका दिला आहे. सहाय्यक निबंध यांनी जिल्ह्यातील 741 दूध संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सहाय्यक निबंध यांनी जिल्ह्यातील 741 दूध संस्थांची नोंदणी रद्द करताना, त्यांच्याकडून दूध संकलनासह लेखापरीक्षण आणि निवडणूक प्रक्रिया ठप्प राहिल्याचा ठपका ठेवला आहे. इतकेच नव्हे तर 741 दूध संस्थांपैकी 506 दूध संस्था या गोकुळ दूध संघाशी निगडीत आहेत. प्रशासनाच्या या कारवाईने गोकुळ दूध संघासह इतर दूध संघातील सत्ताधारी आणि विरोधकांचे मनसुभे उधळले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे आवसायानात निघालेल्या 741 दूध संस्थान पैकी 70 टक्के दूध संस्था या गोकुळ दूध संघातील आहेत. सर्वाधिक दूध संस्था या हातकणंगले तालुक्यातील 94 तर शिरोळ तालुक्यातील दूध संस्थांची संख्या ही 91 आहे. दूध संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनेकांचा प्रयत्न राहिलेला आहे.
राजकीय गणित डोळ्यासमोर ठेवून संस्थेतील राजकारणासाठी केवळ ठरावाच्या मतदानासाठी अशा दूध संस्था निर्माण करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले होते. स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेल्या दूध संस्था केवळ मतदानापुरताच शिल्लक ठेवण्यात आल्या. मागील काही वर्षात या दूध संस्थांचे दूध संकलन लेखापरीक्षण आणि निवडणूक ठप्प झाल्याने अशा दूध संस्थाची नोंदणी आता रद्द करण्यात आली आहे.
97 व्या घटना दुरुस्तीनंतर सहकार कायद्यात बदल करण्यात आला. मात्र यामुळे सहकारात अनेक गोंधळ निर्माण झाले आहेत. नव्या कायद्यानुसार लेखापरीक्षक नेमण्याचे अधिकार संस्थेला दिले आहेत. त्यामुळे संस्थेंकडून आपल्याच मर्जीतील लेखापरीक्षक नेमण्यासाठी ठराव केला. त्यामुळे संस्थेतील व्यवहार उघडकीस येण्यास अडथळा ठरत आहे. त्रयस्थ यंत्रणेमार्फत दोनच लेखापरीक्षण करण्याचा कायदा आल्याने अनेक संस्थांनी लेखापरीक्षण टाळले आहे. त्यामुळे लेखापरीक्षण टाळलेल्या दूध संस्थांना सहाय्यक निबंधकांनी दणका दिला आहे.
पुढील दोन वर्षात गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील 741 आवसानात काढलेल्या दूध संस्थांपैकी 506 दूध संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. या दोन संस्थेमध्ये 70% च्या आसपास गोकुळ दूध संघातील संस्थांचा समावेश आहे. केवळ राजकीय फायदा डोळ्यासमोर घेऊन गोकुळ मधील सत्ताधारी आणि विरोधकांनी अशा दूध संस्था निर्माण केल्याचे समोर आले होते. ठराव गोळा करण्यासाठी अशा संस्था निवडणुकीवेळी समोर केल्या जात होत्या. मात्र अशा संस्थाची नोंदणी रद्द केल्यामुळे त्याचा फटका सत्ताधारी आणि विरोधकांना निवडणुकीत बसणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.