Satara District Bank Election: अतुल भोसलेंनी फेडला उंडाळकरांचा पैरा : कृष्णा कारखान्यातील मदतीची जिल्हा बँकेतील विजयाने परतफेड

Satara DCC Bank Election | Udaysinh Patil Undalkar Election Victory: कृष्णा कारखाना निवडणुकीत उंडाळकरांनी केलेल्या मदतीची भोसले गटाने सातारा जिल्हा बँकेत परतफेड केली. उदयसिंह उंडाळकरांच्या विजयाने कऱ्हाडमधील नव्या राजकीय समीकरणांना बळ मिळाले.
Atul Bhosale backed Udaysinh Undalkar
Atul Bhosale backed Udaysinh UndalkarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara DCC Bank Election News : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कऱ्हाड सोसायटी गटातील लढतीने तालुक्यातील भोसले-उंडाळकर गटाच्या ताकदीवर शिक्कामोर्तब झाले. रयत संघटनेचे प्रमुख उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी भाजपचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष धनंजय पाटील-आटकेकर यांचा ५५ मतांनी पराभव करून जिल्हा बॅंकेत एंट्री केली. कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले यांची मिळालेली साथ उंडाळकरांच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकर गटाने केलेला मदतीचा पैरा जिल्हा बँकेतील विजयाच्या रूपाने भोसले गटाने फेडल्याचेच या निकालातून स्पष्ट झाले.

दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांनी जिल्हा बॅंकेचे अनेक वर्षे नेतृत्व केले. त्यांच्या पश्चात उदयसिंह उंडाळकरांनी बँकेच्या राजकारणात सक्रिय राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या निवडणुकीत माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यावेळी भोसले गटाने बाळासाहेब पाटील यांना साथ दिली. त्यानंतरच्या काळात राजकीय समीकरणे बदलली. कृष्णा कारखाना निवडणुकीत भोसले-उंडाळकर गट एकत्र आले. या राजकीय मनोमिलनाचा फायदा भोसले गटाला कृष्णा कारखान्यासाठी झाला. त्याच सहकार्याची परतफेड करण्याची संधी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भोसले गटाला मिळाली.

डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. भोसले यांनी उंडाळकरांच्या विजयासाठी ताकद लावली. दुसरीकडे, पैलवान धनंजय पाटील-आटकेकर यांना माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी साथ दिली. भोसले गटाच्या मदतीने उंडाळकरांचा विजय सोपा झाला. पैलवान पाटील यांना ४४ मते मिळाली. एक मत बाद झाले. उंडाळकर यांचा ५४ मतांनी या निवडणुकीत विजय झाला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भोसले गटाने उंडाळकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहात राजकीय ऋणानुबंध जपले. पूर्वीच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहिलेले हे दोन गट आता सहकारातील सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे कृष्णा कारखान्यातील मदतीचा पैरा जिल्हा बँकेतील विजयातून फेडल्याचे या निकालाने अधोरेखित केले.

Atul Bhosale backed Udaysinh Undalkar
Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेत सलग दोन पंचवार्षिकला चिठ्ठीचा करिष्मा : कोरेगावमध्येच गतवेळी सुनील खत्रींना तर यंदा सुनील मानेंना साथ

कऱ्हाडला तीन संचालक

सातारा जिल्हा बॅंकेत आता कऱ्हाडच्या तीन संचालकांना स्थान मिळाले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले हे पतसंस्था-बॅंका गटातून, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे कऱ्हाड सोसायटी गटातून, तर ऋतुजा राजेश पाटील-वाठारकर या महिला राखीव गटातून संचालक झाल्या. त्यामुळे कऱ्हाडला पहिल्यांदा तीन संचालकपदे मिळाली आहेत.

Atul Bhosale backed Udaysinh Undalkar
Gokul: गोकुळवर 4 शासननियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळाची मान्यता; मतदानाचा अधिकारही मिळणार : महायुतीचा सतेज पाटलांच्या बहुमताला धक्का!

राजकारणाला दिशा

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील कऱ्हाड सोसायटी गटाचा निकाल तालुक्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत देणारा ठरला. एकेकाळी परस्परविरोधात राजकीय भूमिका घेणारे भोसले-उंडाळकर गट आता सहकारातील निवडणुकीसाठी एकत्र आले. या एकजुटीचा फायदा दोन्ही गटांना झाला आहे. कऱ्हाड दक्षिणेत भोसले- उंडाळकरांची नव्याने जुळलेल्या समीकरणांच्या ताकदीची चाचणीही या निकालातून झाली आहे. आगामी निवडणुकांत या समीकरणाचे पडसाद दिसतील, अशी चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.