Satara Politic's : अविनाश मोहितेंनी ‘कृष्णा’साठी डाव टाकला : नेतृत्वाची धुरा बदलणार; सत्ताधारी भोसले गटही सावध

Yashwantrao Mohite Krishna Sugar Factory : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीपूर्वी भोसले आणि मोहिते गटात राजकीय चुरस वाढली आहे. Avinash Mohite पॅनेलला अर्चना मोहिते नेतृत्व देण्याची शक्यता चर्चेत आहे.
Krishna Sugar Factory Election
Krishna Sugar Factory ElectionSarkarnama
Published on
Updated on

Karad, 06 March : राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधणाऱ्या सातारा जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जून महिन्यात होत आहे. त्यासाठी सध्या राजकीय रण तापू लागले आहे. कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कार्यक्षेत्रात बांधणी केली आहे. मात्र, त्यांच्या गटाला शह देण्यासाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी संस्थापक पॅनेलचा मेळावा घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्धार करत दंड थोपटले आहेत.

अविनाश मोहिते (Avinash Mohite) यांच्या पत्नी अर्चना मोहिते या कारखाना निवडणुकीत सक्रिय होत असून, कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला संस्थापक पॅनेलचे नेतृत्व करण्याचे संकेत मिळत आहे. भोसले गटाच्या विरोधात असलेल्या कारखाना कार्यक्षेत्रातील नेत्यांना एकत्र करून यावेळी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मोहिते गटाने तयारी सुरू केली आहे. मात्र, सत्ताधारी भोसले गटानेही सावध पवित्रा घेऊन मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे.

कृष्णा कारखान्याची (Krishna sugar Factory) निवडणूक अपवाद वगळता अनेकदा गाजली आहे. प्रत्येक निवडणुकीला वेगळा राजकीय संदर्भ असल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील नेत्यांकडूनही आपल्या सोयीनुसार भूमिका घेतल्या गेल्याचे यापूर्वीच्या निवडणुकांमधून दिसून आले आहे.

गेली निवडणूक ही कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. भोसले यांचे जयवंतराव भोसले सहकार पॅनेल, कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल अशी तिरंगी लढत झाली. तीन पॅनेल हाेण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणून निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली.

Krishna Sugar Factory Election
Satara ZP : झेडपी अध्यक्षपदाचा डाव राष्ट्रवादी भाजपवर उलटवणार; शिवेंद्रराजे, गोरे, अतुल भोसले समर्थकांचे वाढविले टेन्शन

निवडणुकीत ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी थेट भूमिका घेऊन अविनाश मोहितेंच्या संस्थापक पॅनेलला, आमदार विश्वजित कदम यांनी इंद्रजित मोहितेंच्या रयत पॅनेलला साथ दिली. त्यावेळी जोमात असलेल्या काँग्रेसचीच आणि दोन्ही मोहितेंच्या मतविभाजनाचा फटका बसून भोसलेंना निवडणूक सुकर झाली. सत्ताधारी डॉ. भोसले यांच्या पॅनेलने निर्विवाद वर्चस्व राखत सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्या. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अतुल भोसले यांना कऱ्हाड दक्षिणची आमदारकी मिळाली. त्यामुळे भोसले गटाचा कारखाना कार्यक्षेत्रात संपर्क आहे.

कृष्णा कारखान्यासाठी गेल्या निवडणुकीवेळी २९ जून २०२१ ला मतदान झाले. एक जुलैला मतमोजणी झाली. त्यामुळे यावेळची निवडणूक जून महिन्यातच होणार आहे. निवडणुकीसाठी अवघे तीन महिने राहिले आहेत. त्यामुळे सध्या राजकीय रण तापू लागले आहे. कृष्णा कारखाना कार्यक्षेत्रातील संस्थापक पॅनेलचा मेळावा माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या उपस्थितीत झाला. त्यात कारखान्याच्या निवडणुकीला ताकदीने मैदानात उतरण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी अविनाश मोहिते यांच्या पत्नी अर्चना मोहिते यांनी ज्या विश्वासाने आजवर संस्थापक पॅनेलच्या सर्व सभासदांनी अविनाश माेहितेंना साथ दिली, ऐतिहासिक सत्तांतर घडवले, जे प्रेम, विश्वास आणि खंबीर साथीच्या यापुढे अपेक्षा करते, असे भावनिक आवाहन करून कारखाना निवडणुकीत सक्रिय होत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या रूपाने कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला पॅनेलचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे त्यांची रणनीती काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, सत्ताधारी भोसले गटानेही सावध पवित्रा घेत मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे.

Krishna Sugar Factory Election
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी जपली बाळासाहेबांची ‘लाईन’; टपरीचालकापासून ट्रक ड्रायव्हरपर्यंत संधी देणाऱ्या ठाकरे शैलीची दिसली झलक

सातारा, सांगलीतील नेत्यांची भूमिका निर्णायक

कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र हे सातारा, सांगली जिल्ह्यांत येते. गेल्या २०२१ च्या निवडणुकीत सातारा, सांगली जिल्ह्यांत कृष्णा कारखान्याची ४७ हजार १४५ एवढी सभासद संख्या होती. हे सभासद कऱ्हाड, वाळवा, शिराळा, कडेगाव तालुक्यांतील आहेत. त्यामुळे त्या-त्या तालुक्यांचे नेतृत्व करणारे माजी मंत्री आणि वाळवा-ईश्वरपूरचे आमदार जयंत पाटील, कडेगावचे आमदार विश्वजित कदम, शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, डाॅ. इंद्रजित माेहिते, अशोकराव थोरात, निशिकांत पाटील, संग्राम देशमुख, पृथ्वीराज देशमुख, मानसिंग नाईक, शिवाजीराव नाईक यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com