Sopal On Babandada : सोलापुरात बबनदादांची पूर्ण शुद्ध हरपली होती; पण एकाच कुंकवाच्या बळावर ते टिकले : सोपलांच्या कोटीने गंभीर कार्यक्रमातही हास्याचे फवारे

Babandada Shinde Birthday Ceremony : बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या दीर्घ हृदयरोगाच्या संघर्षाच्या आठवणी सांगितल्या. गंभीर प्रसंगांवर मात करून बबनदादांनी अवघड हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियाही यशस्वी केली.
Dilip Sopal
Dilip Sopal Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 01 September : माजी आमदार बबनदादा शिंदे हे गेली १० ते १५ वर्षांपासून हृदयरोगाला यशस्वीपणे तोंड देत होते. एकदा तर दरवाजा खटखटून आले आहेत. सोलापुरात डॉ गुरुनाथ परळेंच्या हॉस्पिटलमध्ये बबनदादांची पूर्ण शुद्ध हरपली होती. पण, नशीब बलवत्तर आणि एकाच कुंकवाच्या बळावर ते टिकले आहेत आणि अवघड हृदयरोपण शस्त्रक्रियेतही ते यशस्वी ठरले आहेत, अशा शब्दांत कोटी करत बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी गंभीर कार्यक्रमातही हास्याचे फवारे उडविले.

माजी आमदार बबनराव शिंदे हे हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून तब्बल १४ महिन्यांनंतर माढ्यात आले. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार सोपल बोलत होते.

ते म्हणाले, बबनदादांच्या स्वागतासाठी सकाळी अकरापासून जनता येथे आली आहे. सव्वा वर्षांपूर्वी हृदयरोपण शस्त्रक्रियेसाठी गेले होते. अमेरिकला जाण्यासाठी व्हिसा लवकर मिळत नव्हता, त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले, त्यामुळे बबनदादांना व्हिसा मिळाला. जेव्हा हे सर्व ऑपरेशनसाठी गेले, त्यावेळी प्रत्येकाच्या मनाता धाकधूक होती. कारण अवघड शस्त्रक्रिया होती.

आम्ही १९८५ पासून एकत्र आहोत. ते १९९५ मध्ये आमदार झाले असले तरी आमची मैत्री पूर्वीपासून होती. मंत्रालयात यायचे, त्यावेळी माझ्याच खोलीवर त्यांचा मुक्काम असायचा. आमच्या मैत्रीत ना बबनदादा बिघडले ना मी सुधारलो. आमदार नसतानासुद्धा बबनदादा चिकाटीने काम करायचे. त्या चिकाटीमुळेच ते १९९५ मध्ये अपक्ष आमदार झाले, असेही सोपल यांनी नमूद केले.

Dilip Sopal
Babandada Shinde : तब्बल 14 महिन्यांनंतर माढ्यात आलेल्या बबनदादांचे भव्य स्वागत; अमेरिकेतून येताच म्हणाले, आपल्याला काही गोष्टी पाळाव्या लागतील’

ते म्हणाले, बबनदादा, मी, आणि डिगामामा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो होतो. पक्षाचे आमदार फक्त राजन पाटील आमच्यासोबत असायचे. आम्ही तिघं मिळून कामांचा पाठपुरावा करायचो. पण बबनदादांची चिकाटी जास्त असायची. दादांच्या शर्टाचा खिसा मोठा असायचा. त्याच्यात इतकी निवेदने, प्रश्नांचे कागद असायचे, बऱ्याच वेळा त्यांचा खिसा फाटायचा आणि खालून कागद यायचा. बारीक सारीक कामातसुद्धा त्यांची चिकाटी असायची. उत्साहामुळे कामात व्यस्त राहिल्यामुळे त्यांना आजारपणाचा विसर पडायचा.

हृदय बदलायचं, हे ऐकलं तरी आपलं हृदय धडधडतं. म्हैस आजारी पडली तर मालकाला थंडी वाजून यायचे दिवस. इथं हृदय बदलायचं होतं, अशावेळी मनाचा खंबीरपणा जो लागतो, तो परमेश्वराने बबनदादांमध्ये जन्मजात दिलेली होती. त्यामुळेच बबनदादा खचून गेलेले नाहीत. जातानाही निरोप देणाऱ्यांचा चेहरा रडवेला होता, पण त्यांचा चेहरा हसतमुख होता, असेही सोपल यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, बबनदादा आतापर्यंत सर्वासाठी झटत आलेले आहेत. त्यांनी अनेक वर्षे डॉ तात्याराव लहाने यांच्या माध्यमातून नेत्रशिबिरं घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून अनेकांना दृष्टी देण्याचे काम बबनदादांनी केलेले आहे. त्यांच्या डोळ्यात आज आनंदाश्रू तरळले आहेत.

Dilip Sopal
Phaltan Hospital : डॉ राजेंद्र रुपनवर यांच्या न्यायासाठी दोन माजी आमदार, एका आमदाराचा महामार्गावर ठिय्या; फलटण-पंढरपूर मार्ग रोखला

आज आपण बबनदादांची ७५ जरी साजरी करत असलो तरी हृदयरोपण शस्त्रक्रियेमुळे बबनदादांचं हृदय पंचविशीचं झालं आहे, त्यामुळे इथून पुढे शंभरी गाठेपर्यंत त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, कारण त्यांच्या पाठीशी पांडुरंग आहे, असेही सोपल यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com