Babanrao Shinde : अमेरिकेत उपचारासाठी गेलेल्या बबनदादांचा अजितदादांना फोन... कारण काय?

Ajit Pawar News : माजी आमदार बबनराव शिंदे हे हृदयावरील उपचारासाठी 13 जून रोजी अमेरिकेला गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदेही आहेत. अमेरिकेत बबनदादांच्या हृदयावर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यात येत आहेत.
Babanrao Shinde-Ajit Pawar
Babanrao Shinde-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 July : माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बबनराव शिंदे हे सध्या हृदयावरील उपचारासाठी अमेरिकेत गेले आहेत, त्याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आणखी एक महिनाभर त्यांच्यावर अमेरिकेत उपचार करण्यात येणार आहेत, असे या फोन कॉलनंतर स्पष्ट होत आहे. मात्र अमेरिकेत उपचारासाठी गेलेले बबनराव शिंदे यांनी मतदारसंघातील एका कामांसंदर्भात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला.

माजी आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) हे हृदयावरील उपचारासाठी 13 जून रोजी अमेरिकेला गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदेही आहेत. अमेरिकेत बबनदादांच्या हृदयावर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यात येत आहेत. शिंदे हे उपचारासाठी अमेरिकेला गेले असले तरी त्यांचे माढा विधानसभा मतदारसंघावर लक्ष कायम आहे.

माढा मतदारसंघातील कामासंदर्भात बबनराव शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना फोन लावला आहे. सुरुवातीला रणजित शिंदे यांच्याकडून अजितदादांनी बबनराव शिंदे यांच्यावरील उपचाराबाबत माहिती जाणून घेतली. उपमुख्यमंत्री पवार आणि रणजित शिंदे, बबनराव शिंदे यांच्यातील संवाद पुढील प्रमाणे

रणजित शिंदे : नमस्कार दादा, रणजित बोलतोय..

अजित पवार : हं बोला, बोला...

रणजित शिंदे : काय नाही, दादांना अमेरिकेत ॲडमिट केले आहे. अजून एक महिना लागेल ऑपेरशनला...

अजित पवार : अरे बापरे....महिना लागेल का?

रणजित शिंदे : तपासण्या वैगेरे चालू आहेत. फोन एवढ्यासाठी केला होता, दादा की, उजनीतून खाली नदीत पाणी सोडण्यात आले आहे. पण, कॅनॉलमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी सोडलं जात नाही.

Babanrao Shinde-Ajit Pawar
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री गेल्या 35 वर्षांत पाहिला नाही; भाजप नेत्याची सडकून टीका

अजित पवार : ठीक आहे, मी कॅनॉलला पाणी सोडायला लावतो.

रणजित शिंदे : बाकीचे लिफ्ट सुरू करून तलाव वगैरे भरून घ्यायचे...

अजित पवार : मी ताबडतोब सांगतो...तुझा फोन ठेवला की सांगतो.

रणजित शिंदे : आणि दादांना देतो...

अजित पवार : नाही एक मिनिट थांब... ते आता याच्याकडे असेल ना.

रणजित शिंदे : खांडेकर म्हणून एसी आहेत.

अजित पवार : नाही नाही, सीई कोण आलंय तिथं.

रणजित शिंदे : अंऽऽ अंऽऽऽ

अजित पवार : धुमाळ, नाही धुमाळ ईडीआय...मला वाटतं धुमाळच्या जागी, पूर्वी धुमाळच्या अंडर येत होत ना.

रणजित शिंदे : हो, धुमाळच्या अंडरच..

अजित पवार : मग चोपडे आला आहे, तिथं.

रणजित शिंदे : हं

अजित पवार : चोपडे माझ्याकडं पुण्याला होता तो. मी सांगतो त्याला..

रणजित शिंदे : दादांना देतो...एक मिनिट

बबनराव शिंदे : हं दादा नमस्कार

अजित पवार : दादा नमस्कार...आता रणजितनं सांगितलं सगळं. तुम्ही पहिले तब्येतीची काळजी घ्या. मी लगेच चोपडेंना पाणी सोडण्याबाबत सांगतो. चोपडे पूर्वी पुण्यात एसी होते. त्यांना धुमाळच्या जागी घेतले आणि धुमाळ पुण्याला आले आहेत. मी चोपडेंना सांगतो, कॅनॉलला पूर्ण क्षमतेने पाणी सोडायला. लिफ्ट चालू करायला.

Babanrao Shinde-Ajit Pawar
Assembly Session : सुधीरभाऊंच्या कोटीने जयंतराव, वडेट्टीवार, आव्हाड खळखळून हसले, म्हणाले, ‘आम्ही एवढं कर्ज करू की....’

बबनराव शिंदे : लिफ्ट चालू करून तळीबिळी भरून द्यायला. नदीला ५० हजार क्युसेकने पाणी सुटलंय.

अजित पवार : मी लगीचच सांगतो. तुमचा फोन झाल्या झाल्या सांगतो.

बबनराव शिंदे : होय होय... बाकी बरंय दादा, सध्या तपासण्या सुरू आहेत.

अजित पवार : ठीकय ठीकय सगळं चांगलं होईल. सगळ्यांचं चांगलं केलं आहे, त्यामुळे सगळं चांगलं होईल. तशी अपेक्षा करायला हरकत नाही.

बबनराव शिंदे : ओके....

अजित पवार : ओके....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com