Mumbai, 29 July : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी पुढचे दोन दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही पक्षांकडून दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज (ता. 29 जुलै), तर शिवसेना ठाकर गटाच्या सुनावणी उद्या (ता. 30 जुलै) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्यामुळे सुनावणीतून कोणता निर्णय येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) 23 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार हेाती. मात्र, नीट परीक्षेतील सुनावणी दिवसभर सुरू राहिल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नव्हती.
शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) वकिल ॲड अभिषेक मनु सिंघवी यांनी या बाबतचा मुद्दा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यापुढे मांडला. त्यानंतर चंद्रचूड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुनावणी 29 जुलै रोजी, तर ठाकरे गटाच्या याचिकेवर 30 जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले हेाते, त्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर सुनावणी होणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्यापुढील सुनावणीत कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवले नव्हते, त्यामुळे शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे, तर ठाकरे गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर 23 जुलै रोजी सुनावणी होणार होती. मात्र, नीट परीक्षेची सुनावणी दिवसभर चालल्याने ही पुढे ढकलण्यात आली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे.
अजित पवार आणि शरद पवार गटाने एकमेकांचे आमदार अपात्र करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केलेले आहेत. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडे सोपवला आहे. त्याविरोधात शरद पवार गटाने न्यायालयात धाव घेऊन आपणच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.