NCP Politics : अजित पवार कुणाची विकेट काढणार; बड्या नेत्याचा मुलगा संपर्कात?

Ajit Pawar Nagpur Tour : अनिल देशमुख यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. देशमुख यांच्या परंपरागत काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघावर त्यांनी दावा केला आहे. एकाच मतदार संघावर वडील व मुलाने केलेल्या दाव्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 30 August : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा आमच्या संपर्कात आहे, असा दावा राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला होता. त्यावर देशमुखांनी त्यांचीच मुलगी आमच्या संपर्कात असल्याचे सांगून प्रत्त्युत्तर दिले होते. दोन्ही आजी-माजी मंत्र्यांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू असताना शनिवारी काटोल विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मोठा राजकीय धमाका होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख (Salil Deshmukh) यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. देशमुख यांच्या परंपरागत काटोल-नरखेड विधानसभा मतदार संघावर त्यांनी दावा केला आहे.

त्यांनी मध्यंतरी शदर पवार यांची भेट घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. एकाच मतदासंघावर वडील व मुलाने केलेल्या दाव्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

या दरम्यान सलील देशमुख हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संपर्कात असल्याचे सांगून धर्मराव बाबा आत्राम यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यास अनिल देशमुख यांनी लगचे उत्तर देऊन त्यांनी तुमची मुलगी आमच्या संपर्कात आहे, याची चिंता आत्राम यांनी करावी, असे प्रत्युत्तर दिले होते. विशेष म्हणजे धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगीसुद्धा निवडणूक लढण्याची तयारी करीत आहे.

Ajit Pawar
Solapur Bazar Samiti : राजेंद्र राऊतांनी बाजी मारली; दोन देशमुख कधी करून दाखवणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या शनिवारी नागपूरला येत आहेत. लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. अजित पवार दीक्षाभूमीला भेट देणार आहेत, त्यानंतर काटोलमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे.

आम्ही जाहीर केल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बहिणींच्या खात्यात जमा केला आहे. विरोधक आरोप करत राहिले, आम्ही निधी दिला असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या शनिवारी नागपूरमध्ये येणार आहेत. ते दीक्षाभूमीला भेट देतील आणि नंतर काटोल येथे सभा घेणार आहे. सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी धर्मराव बाबा आत्राम नागपूरला आले असता त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात २० जागांची मागणी केली असून निवडूण येणारे उमेदवार आम्ही देऊ. निवडून आलेला उमेदवार हा महायुतीचा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Video-Satej Patil : शौमिका महाडिक केवळ TRP साठी गोंधळ घालतात; त्यांचं दुःख वेगळंच; सतेज पाटलांचा पलटवार

माझी लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहण्याची इच्छा होती. गडचिरोलीतील लोकांचीसुद्धा हीच भावना होती. आता विधानसभेची निवडणूक लढावी, त्यानंतर मुलीला पुढ आणावे, अशी मागणी मतदारांची आहे. मला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. मी निवडणूक लढवावी, असा मतदारांचा आग्रह असल्याचेही आत्राम यांनी सांगितले.

माझी मुलगी कोणाच्या संपर्कात आहे, हे अनिल देशमुख यांनाच विचारा, असा टोलाही त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com