Ajit Pawar In Karad : पवारांच्या आमदाराला तटकरे म्हणाले, 'नेते... नेते'; तर 'कारखाना चालू की बंद?' अजितदादांचा सवाल

Ajit Pawar In Karad : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम येथे समाधीस्थळी अभिवादन केले.
balasaheb patil sunil tatkare ajit pawar
balasaheb patil sunil tatkare ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी शरद पवार आणि अजित पवार गटातील नेत्यांनी हास्यकल्लोळात एकमेकांची भेट घेतली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी शरद पवार गटाच्या आमदाराला केलेल्या पहिल्या वाक्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

balasaheb patil sunil tatkare ajit pawar
Kolhapur News: शेवटच्या क्षणापर्यंत लोकसभेचा सर्व्हे; त्यावरच ठरणार कोल्हापूर-हातकणंगलेतील रणनीती

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम येथे समाधीस्थळी अभिवादन केले. या वेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ( Sunil Tatkare ), शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"सह्याद्री चालू की बंदी?"

या भेटीवेळी अजितदादांनी ( Ajit Pawar ) बाळासाहेब पाटलांना केलेल्या प्रश्नानं मात्र सर्वजण आवाक् झाले. अजितदादा बाळासाहेब पाटलांना म्हणाले, "सह्याद्री चालू आहे की बंद आहे?" त्यावर "चालूय... चालूय," असं पाटलांनी म्हटलं.

"नेते... नेते... नेते..."

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रीतिसंगम येथे दाखल होताच बाळासाहेब पाटील त्यांच्या स्वागतासाठी पुढे गेले. बाळासाहेब पाटलांना पाहताच सुनील तटकरे यांनी "नेते... नेते... नेते..." म्हणत हस्तांदोलन केलं.

balasaheb patil sunil tatkare ajit pawar
Sangli Lok Sabha 2024: भाजपच्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट? सांगलीसाठी नवीन पाच नावे समितीकडे...

अजितदादांच्या दौऱ्याला उशीर

उपमुख्यमंत्री अजित पवार कराड येथील विमानतळावर पावणेआठ वाजता येणार होते, तर आठ वाजता यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार होते. मात्र, दौऱ्याला उशीर होऊन ते साडेआठ वाजता समाधीस्थळी दाखल झाले.

यानंतर पी. डी. पाटील प्रतिष्ठानकडून आयोजित यशवंतराव चव्हाण यांना स्वरसुमनांजली या कार्यक्रमास अजितदादा आणि मान्यवरांनी हजेरी लावली. जवळपास अर्धा तास या ठिकाणी देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम झाल्यावर उपस्थित हजारो विद्यार्थ्यांसमोर अजितदादांनी यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी माहिती दिली.

balasaheb patil sunil tatkare ajit pawar
Sharad Pawar News: "दिलीप बनकर हे तर गद्दार, शरद पवारांचा फोटो वापरल्यास...", राष्ट्रवादीचा इशारा

दरम्यान, राज्यातील सहकारी साखर कारखान्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. अनेक कारखान्यांत घोटाळ्याचे आरोप होत आहेत. तसेच, घोटाळ्यांचा आरोप असलेल्यांना महायुतीत सामील करून घेत जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. अशातच कराड दौऱ्यावर असताना अजिदादांनी बाळासाहेब पाटलांना थेट सह्याद्री साखर कारखाना चालू की बंद, असा प्रश्न केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

balasaheb patil sunil tatkare ajit pawar
Satara Loksabha News : शिंदेंचा शिलेदार करणार इच्छुकांची अडचण; कोणाला बसणार फटका..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com