Sharad Pawar Banner in Niphad
Sharad Pawar Banner in NiphadSarkarnama

Sharad Pawar News: "दिलीप बनकर हे तर गद्दार, शरद पवारांचा फोटो वापरल्यास...", राष्ट्रवादीचा इशारा

Sharad Pawar Group Slams Dilip Bankar : आमदार दिलीप बनकर यांना त्यांच्याच फ्लेक्सशेजारी नवे फ्लेक्स लावून राष्ट्रवादीनं उत्तरदेखील दिलं आहे.
Published on

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) बुधवारी (13 मार्च) निफाड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे. त्यामुळे राजकारण तापले आहे. शरद पवार यांच्या स्वागतासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. पवार यांच्या स्वागतासाठी तालुक्यातील सर्व महत्त्वाच्या चौकांमध्ये स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत.

Sharad Pawar Banner in Niphad
Dattatray Bharne News : 'समजनेवाले को इशारा ही काफी...' ; आमदार भरणेंचं सूचक वक्तव्य!

यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam)आणि त्यांचे समर्थकदेखील आघाडीवर आहेत. मात्र, या बॅनरच्या गर्दीत विद्यमान आमदार आणि अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश केलेले दिलीप बनकर (Dilip Bankar) यांनीही शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. त्यावरून राजकारण चांगले तापले आहे. नागरिकांमध्येदेखील त्याविषयी विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांनी आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांना चांगलेच सुनावले आहे. "गद्दारांनी शरद पवार साहेबांचा फोटो वापरू नये, अन्यथा त्यांना धडा शिकविला जाईल. आम्ही याबाबत पोलिसांकडे कारवाईची मागणीसुद्धा करणार आहोत.

शरद पवार यांना त्यांच्या राजकीय चढउतारात कार्यकर्त्यांनी महत्त्वाची साथ दिली. मात्र, ज्या नेत्यांना आमदारकी दिली, अडचणीच्या काळात मदत केली, असे आमदार दिलीप बनकर हे गद्दार निघाले. राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षात फूट पाडली तेव्हा ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेले. असे असताना त्यांना शरद पवारांची आठवण का येते?" असा सवाल पुरुषोत्तम कडलक यांनी उपस्थित केला आहे.

Sharad Pawar Banner in Niphad
Nanded Congress News : नांदेड काँग्रेसची धुरा आता बेटमोगरेकर, कदमांच्या खांद्यावर

यासंदर्भात आमदार दिलीप बनकर यांना त्यांच्याच बॅनरच्या शेजारी नवे बॅनर लावून राष्ट्रवादीनं उत्तरदेखील दिलं आहे. त्यात शरद पवार यांनी स्वतः केलेले आवाहन कोट करण्यात आले आहे. 'गद्दार नेत्यांनी माझा फोटो वापरू नये,' असे शरद पवार म्हणाले होते. बॅनरवर तेच शब्द टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या निफाड तालुक्यात शरद पवार यांचा दौरा आमदार बनकर यांनी लावलेल्या बॅनरच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या टीकेमुळे चर्चेचा विषय ठरला आहे.

Sharad Pawar Banner in Niphad
Satara Loksabha News : शिंदेंचा शिलेदार करणार इच्छुकांची अडचण; कोणाला बसणार फटका..?

निफाड तालुक्यात विविध राजकीय पक्ष आहेत. पण, येथील मतदार आणि शेतकऱ्यांवर शरद पवार यांचा विशेष राजकीय प्रभाव आहे. पवार कृषिमंत्री असताना त्यांनी द्राक्ष, कांदा आणि विविध भाजीपाला उत्पादकांच्या समस्यांबाबत महत्त्वाचे व जलद निर्णय घेतले.

अनेक नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या या राजकीय प्रभावाचा लाभ व्हावा म्हणून आमदार बनकर यांनी यापूर्वीही स्वागताचे बॅनर लावले होते. मात्र, यंदा त्यांनी लावलेल्या बॅनरमुळे ते चांगलेच अडचणीत आल्याचे चित्र आहे.

R

Sharad Pawar Banner in Niphad
Shivsena UBT News : ओमराजेंमुळेच सावंतांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडले गेले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com