Balasaheb Thorat : राहुल गांधींच्या यात्रेमुळे भाजप अवाक

भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील नियोजन बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्याकडे आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thorat : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून भाजप अवाक झाली आहे. त्यामुळे ते तथ्य नसलेले आरोप करत आहेत, असा टोला काँग्रेसचे विधीमंडळ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील नियोजन बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्याकडे आहे. 7 अथवा 9 नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. 16 दिवस ही यात्रा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून जाईल. या यात्रे संदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक बाळासाहेब थोरात यांनी घेतली. या बैठकीला आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, सचिन गुजर, करण ससाणे, संपत म्हस्के, प्रताप शेळके, हेमंत ओगले, ज्ञानेश्वर मुरकुटे आदी उपस्थित होते.

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat : 'मी 38 वर्षे आमदार आहे.. पण असला प्रकार कधी पाहिला नाही!'

थोरात म्हणाले की, भारत जोडोला केरळमध्ये अपेक्षे पेक्षाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. देशातील महागाई, लोकशाहीची होत असलेली गळचेपी यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे यात्रेला प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेससह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांसह अनेक सामाजिक संघटना या यात्रेशी जोडल्या गेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat : भाजपची अशी ही बनवाबनवी सुरूच

यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपने प्रथम राहुल गांधींच्या टी शर्टवर टीका केली. त्यामुळे भाजपच सोशल मीडियावर ट्रोल झाले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यात्रा कन्याकुमारीत गेल्यावर तथ्य नसलेली टीका केली. सत्य समोर आल्यावर मात्र त्या काहीही बोलल्या नाहीत. गॅसच्या टाकीचे दोन रुपयांनी भाव वाढताच रस्त्यावर गॅसची टाकी घेऊन बसणाऱ्या स्मृती इराणी आता इंधन दरवाढीवर बोलतही नाहीत. मीठ व पिठावर कर लावण्यात आला. महाराष्ट्रातील प्रकल्प दम देऊन गुजरातला नेण्यात आले. या सर्वांच्या विरोधात ही यात्रा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com